शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

Maharashtra Election 2019 : मुख्यमंत्र्यांकडून लोकशाहीचा अपमान : विश्वजित कदम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 9:36 PM

बेरोजगारी, कर्जमाफी या मुद्द्यांना प्रचारात बगल

ठळक मुद्देकदम शनिवारी कसबा व पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात

पुणे : ' विधानसभा निवडणुकीत विरोधकच नाही, कुणासोबत लढायचे ' या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडून लोकशाहीचा अपमान केला जात असल्याची टीका केली. तसेच जनतेच्या मुळ प्रश्नांना बगल देत भावनिक मुद्यांवरच प्रचार केला जात असून राजकारणाची दिशा बदलली असल्याचेही कदम म्हणाले.कदम शनिवारी कसबा व पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपा-शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, देशात राष्ट्रीय पक्षांसह अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत या पक्षांना मिळालेली मते भाजपापेक्षा जास्त आहेत. राज्यात सर्व २८८ मतदारसंघात भाजपा विरोधात उमेदवार आहेत. पण त्यांना लोकशाहीचा विसर पडलेला दिसतो. मागील पाच वर्षात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात सरकार पुर्णपणे अपयशी ठरले आहेत. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली दिलेली कर्जमाफी कागदोपत्रीच राहिली आहे. देशामध्ये भितीचे वातावरण आहे. महागाई, बेरोजगारी, जीएसजीमुळे त्रासलेले व्यापरी, शेतकरी आत्महत्या असे अनेक प्रश्न असताना त्यावर बोलले जात नाही. केवळ ३७० कलमासारख्या भावनिक मुद्द्यांवर प्रचार केला जात आहे. राजकाराणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर लक्ष हटविले जात आहे. पण जनतेमध्ये नाराजी असून मतदानातून हा आक्रोश बाहेर येईल. बहुमताने आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.------------पुण्याला न्याय नाहीपुण्याला चोवीस तास पाणी देण्याचे आश्वासन पुर्ण करता आले नाही. कोथरुडमधील उड्डाण पुलाचा प्रश्न प्रलंबित आहे. शहराला विविध योजनांतून मिळणारा २२०० कोटी रुपयांचा निधी मिळालेला नाही. पुण्यात भाजपाचे दोन खासदार, आठ आमदार आणि शंभरहून अधिक नगरसेवक असताना पुणेकरांना न्याय देता आला नाही, अशी टीका कदम यांनी केली.-----

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVishwajeet Kadamविश्वजीत कदमBJPभाजपाElectionनिवडणूक