शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : अखेर ब्राह्मण महासंघाच्या उमेदवारांची माघार ; देणार कमळाला साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 19:22 IST

काेथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या विराेधात उभे राहिलेल्या ब्राह्मण महासंघाच्या उमेदवाराने अखेर उमेदवारी मागे घेतली आहे.

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काेथरुडमधून उमेदवारी जाहीर हाेताच ब्राह्मण महासंघाने त्यांच्या उमेदवारीला विराेध केला हाेता. पाटील यांच्या विराेधात महासंघाने काेथरुड विधानसभा मतदार संघातून मयुरेश अरगडे यांना उमेदवारी दिली हाेती. तर राहुल जाेशी यांनी देखील ब्राह्मण महासंघाकडून उमेदवारी दाखल केली हाेती. चंद्रकांत पाटील यांच्यासाेबत काल ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने उमेदवारी मागे घेत असल्याची माहिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गाेविंद कुलकर्णी यांनी दिली. 

पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ब्राह्मण महासंघाने सुरुवातीला पाटील यांच्या उमेदवारीला विराेध केला हाेता. काेल्हापूरच्या मंदिरात जेव्हा ब्राह्मण पुजारांच्या प्रश्न आला तेव्हा पाटील यांनी माैन बाळगले तसेच संभाजी बागेतून राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविल्यानंतरही पाटील यांनी कुठलिही कारवाई केली नसल्याचा आराेप ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आला हाेता. तसेच गरीब ब्राह्मण मुलांसाठी आर्थिक विकास महामंडळ तयार करावे, पाेराहित्य करणाऱ्यांना महिना पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे, ब्राह्मण समाजासाठी अ‍ॅट्राेसिटी चा कायदा करावा अशा मागण्या देखील ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आल्या हाेत्या. या सर्व मागण्यांसंदर्भात पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पाटील यांना पाठींबा जाहीर केल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. 

कुलकर्णी म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्याशी आमची चर्चा झाली. त्या चर्चेतून समाधनकारक उत्तरे मिळाली. महासंघाच्या दाेन्ही उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. कसबा मतदारसंघामध्ये भाजपाच्या मुक्ता टिळक यांना पाठींबा देण्याचे ठरले असून काेथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांना आम्ही पाठींबा देणार आहाेत. राज्यातील इतर ब्राह्मण उमेदवारांना पाठींबा देण्याबाबत जिल्हास्तरावर निर्णय घेण्यात येणार आहेत. 

टॅग्स :brahman mahasanghब्राह्मण महासंघBJPभाजपाPuneपुणेElectionनिवडणूक