शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : भाजपच्या ‘त्या’ निर्णयाने अजित पवार बुचकळ्यात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 13:45 IST

भाजपने चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांना उमेदवारी नाकारली, याचे  मलाही आश्चर्य वाटले....

बारामती : भाजपने चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांना उमेदवारी नाकारली, याचे  मलाही आश्चर्य वाटले. अर्थात हा त्या पक्षाचा अधिकार आहे, त्यामुळे  त्यावर अधिक बोलणार  नाही. कदाचित त्यांच्यावर वेगळी जबाबदारी सोपविली जाईल. या निर्णयाने बुचकळ्यात पडल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अमित शहा व चंद्रकांत पाटील यांचा हा अधिकार आहे, हे सांगायला पवार विसरले नाहीत.माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजपने विद्यमान मंत्र्यांना दिलेल्या डच्चूबाबत बुचकळ्यात पडल्याचे सांगितले. तत्पूर्वी पवार यांनी शुक्रवारी (दि. ४)  बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातील कसब्यातून गुनवडी चौक, इंदापूर चौकमार्गे त्यांची मिरवणूक काढण्यात आली. सुरुवातीला त्यांनी आईचा आशीर्वाद घेत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हार अर्पण करून पवार यांनी अर्ज दाखल केला. या वेळी पवार यांच्यासमवेत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, किरण गुजर, सतीश काकडे अर्ज दाखल करताना उपस्थित होते. पवार म्हणाले, गोपीचंद पडळकर हे बाहेरचे उमेदवार आहे असे नाही. कोणालाही कोठेही उभे राहता येते, हा घटनेने दिलेला अधिकार आहे. मी प्रचार करतानाही बाहेरचा उमेदवार असा प्रचार करणार नाही. आपण एक लाख मताधिक्याने विजयी होऊ. आजचे वातावरण विचारात घेता हे मताधिक्य वाढेल. बारामतीकरांचा विशेषत: युवक व महिलांमध्ये कमालीचा उत्साह आहे, बारामतीकर माझ्यावर किती प्रेम करतात हेच आजच्या मिरवणुकीने दिसून आल्याचे पवार म्हणाले. 

 

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलVinod Tawdeविनोद तावडेElectionनिवडणूकPoliticsराजकारण