शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

Maharashtra: उत्तरेकडे थंड वाऱ्याची लाट, महाराष्ट्रात थंडीचा कडाका आणखी वाढणार

By श्रीकिशन काळे | Published: February 01, 2024 3:37 PM

दोन दिवस आणखी किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे...

पुणे : उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने किमान तापमानात घट होत आहे. पुण्यामध्ये या हंगामात दुसऱ्यांदा किमान तापमान घसरण पहायला मिळाली असून, गुरूवारी हवेलीला ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर शिवाजीनगरमध्ये १०.९ अंश सेल्सिअस तापमान होते. दोन दिवस आणखी किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात चढ-उतार पहायला मिळत आहे. आता दोन दिवसांमध्ये दुपार लख्ख उन्ह पडत असल्याने पुणेकरांना थंडीपासून दिलासा मिळत होता. पण गुरूवारपासून पुन्हा थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. देशाच्या पश्चिमी भागात वाऱ्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याची वाटचाल पुर्वेकडे आहे. एक प्रभावी चक्रीय हवा राजस्थानमध्ये तयार झाली आहे. तसेच उत्तर भारतामध्येही अशीच स्थिती असल्याने महाराष्ट्रात आर्द्रता येत आहे. उत्तरेकडून थंड वारे येत असल्याने किमान तापमानात घट होत आहे. ३ फेब्रुवारीपासून किमान तापमानात आणखी तापमान कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.पुण्यात आकाश निरभ्र राहील. ३ व ४ फेब्रुवारी रोजी अंशत: आकाश ढगाळ राहतील. ४८ तासांमध्ये २ डिग्रीने किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील वाऱ्यामुळे किमान तापमानात ३ डिग्रीने घट होईल. परिणामी दिवसाही थंडी जाणवार आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यमी म्हणाले, पुण्यात उद्या (दि.२) देखील किमान तापमानात घट होईल. हे किमान तापमान १० अंशाच्या खाली जाईल. शिवाजीनगरा सिंगल डिजिटवर तापमानाची नोंद होऊ शकते. गुरूवारी शिवाजीनगरला १०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.’’

शहरातील किमान तापमानशिरूर : ८.७

हवेली : ९.०एनडीए : ९.८

लोणावळा : १०.०शिवाजीनगर : १०.९

पाषाण : १२.०कोरेगाव पार्क : १६.३

मगरपट्टा : १७.१वडगावशेरी : १८.४

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीPuneपुणे