महाराष्ट्र भाग्यवान
By Admin | Updated: October 30, 2014 23:53 IST2014-10-30T23:53:38+5:302014-10-30T23:53:38+5:30
उत्तरेपासून दक्षिणोर्पयतच्या विविध घराण्यांतील गायक महाराष्ट्रात आले आणि येथेच स्थायिक झाले. त्यामुळे महाराष्ट्र शास्त्रीय संगीतासाठी खरोखरच भाग्यवान आहे,

महाराष्ट्र भाग्यवान
मेहकर (बुलडाणा): तालुक्यातील शहापूर येथील एका पाच वर्षीय मुलीवर उपचारादरम्यान शहरातील चिल्ड्रेन्स हॉस् िपटलमध्ये डॉक्टरने हलगर्जीपणा केल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार मृतक मुलीच्या पित्याने मेहकर पोलिस स्टेशनला केली आहे. याप्रकरणी डॉक्टर विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील मौजे शहापूर येथील रामकिसन संपतराव ठाकरे यांची पाच वर्षीय मुलगी श्रद्धा हिला ताप आल्याने शहरातील डॉ.प्रकाश लाहोटी यांच्याकडे २५ ऑक्टोबर रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान श्रद्धा हिच्यावर २ ते ३ दिवस उपचार करुनही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. तीन दिवसानंतर श्रद्धाची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने डॉ.प्रकाश लाहोटी यांनी दुसरीकडे हलविण्याचा सल्ला दिला. दरम्यान श्रद्धाचा २८ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ.प्रकाश लाहोटी यांच्या हलगर्जीमुळेच श्रद्धाचा मृत्यू झाल्याची तक्रार मृतक श्रद्धाचे वडील रामकिसन संपतराव ठाकरे (३५) यांनी मेहकर पोलिस स्टेशनला २९ ऑक्टोबरला दिली. त्यावरुन डॉ.प्रकाश लाहोटी यांच्याविरुद्ध कलम ३0४ (अ) भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.