शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 10:39 IST

शरद पवार हे आज बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात चार तर शहरात दोन ठिकाणी सभा घेणार आहेत.

Sharad Pawar Baramati ( Marathi News ) : बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत रंगणार आहे. कारण या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यातच स्वत: शरद पवार यांनी युगेंद्र यांच्या विजयासाठी ताकद लावल्याने बारामतीचं राजकारण ढवळून निघालं आहे. शरद पवार हे आज बारामतीत तब्बल ६ सभा आणि मेळावे घेणार आहेत. या मेळाव्यांच्या माध्यमातून ते बारामतीकरांशी संवाद साधणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यातून धडा घेत अजित पवार यांनी आता पदाधिकाऱ्यांवर विसंबून न राहता गावोगावी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला असून त्यांचा गावभेट दौरा सुरू आहे. अशातच आता युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवार हेदेखील मैदानात उतरले असून ते आज बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात चार तर शहरात दोन ठिकाणी सभा घेणार आहेत. त्यामुळे अजित पवारांसाठी यंदाची विधानसभा निवडणूक आव्हानात्मक ठरणार असल्याचं दिसत आहे.

अजित पवारांकडूनही प्रचाराचा झंझावात

उपमुख्यमंत्री अजित पवार दिवाळीनिमित्त बारामती तळ ठोकून आहेत. दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अजित पवार यांनी ५९ गावांचा दौरा पूर्ण केला. दुसऱ्या दिवशी पाडवा भेट कार्यक्रमानंतर भाऊबीजेच्या दिवशी पवार यांनी २७ गावांचा दौऱ्याला भल्या सकाळी सुरुवात केली. सकाळी ७ ला सुरु झालेला पवार यांचा दौरा रात्री सुमारे ९ वाजेपर्यंत सुरु होता. यावेळी दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. ते म्हणाले, लोकसभेला ताईला मतदान करून साहेबांना खुश केलं, आता खालच्या निवडणुकीत (विधानसभा निवडणुकीत) मला खुश करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवारांनी गावकऱ्यांना केले. अजित पवार म्हणाले की, गावकऱ्यांनो मला माहिती आहे. तुमच्या मनात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही बोलत नव्हता. परंतु तुमच्यात अंडर करंट होता. तेव्हा काहीजण म्हणायचे की, साहेबांच आता एवढं वय झालंय. या वयात जर सुप्रियाताई पडल्या, तर साहेबांना कसं वाटेल? मग लोकसभेला आपण ताईंना मतदान करू, असे म्हणत अजित पवार म्हणाले की, लोकसभेला जे केलं ते ठीक आहे. ते मी स्वीकारलं. लोकसभेला ताईंना मतदान करून तुम्ही साहेबांना खुश केलं. बारामतीकरांवर माझाही तेवढाच अधिकार आहे. आता विधानसभेला खालची निवडणूक आहे. तर या निवडणुकीत दादाला खुश करा, असं मिश्कील वक्तव्य त्यांनी केले. त्यावर उपस्थितांमध्येही हशा पिकला. "साहेब जरी आले तरी तुम्ही साहेबांना सांगा, लोकसभेला तुमचं काम केलं. तुम्हाला खुश केलं. आता ' दादा' काम करतात. आता त्यांना खुश करू आणि बारामती तालुक्याचा विकास आप आपल्या परीने करू," असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारbaramati-acबारामतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024