शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
4
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
5
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
6
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
7
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
8
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
9
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
10
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
11
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
12
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
13
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
14
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
15
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
16
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
17
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
18
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
19
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
20
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली

संघर्ष पुन्हा काका-पुतण्यातच, अजित पवारांसाठी अस्तित्वाची लढाई; युगेंद्र पवारांसाठी आजोबा मैदानात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 11:38 IST

Maharashtra Assembly Election 2024 : अख्ख्या देशाचे लक्ष लोकसभेला बारामतीकडे होते. तीच परिस्थिती आता विधानसभेला निर्माण झाली आहे. अ

- सचिन कापसे पुणे : बारामती विधानसभा म्हणजे अजित पवार, हे २०१९ पर्यंतचे समीकरण. या समीकरणाला धक्का बसला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत. खुद्द अजित पवार यांच्या विधानसभा क्षेत्रात सुनेत्रा पवार लोकसभेला पिछाडीवर राहिल्या. तेव्हा वरवर सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे वाटणारी निवडणूक थेट शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच झाली. आताही अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असली तरी नातवासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे अजित पवारांसाठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. अख्ख्या देशाचे लक्ष लोकसभेला बारामतीकडे होते. तीच परिस्थिती आता विधानसभेला निर्माण झाली आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राजकीय गणिते कमालीची बदलली आहेत. लोकसभेचे निकाल सर्वश्रुत आहेत. १९९१ पासून एकतर्फी अजित पवारांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात आता चित्र वेगळे आहे. 

कौटुंबिक कलहात कोणाचे पारडे जड?  लोकसभेला पवार कुटुंबातील नणंद भावजयीचा सामना रंगला होता. कौटुंबिक कलहात शरद पवार यांच्याबद्दलच्या सहानुभूतीचा फायदा सुप्रिया सुळे यांना मिळाला आणि सुनेत्रा पवारांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव झाला. त्यामुळे आता विधानसभेला मतदार काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्युक्याचे ठरेल. 

लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?- लोकसभेच्या विजयानंतर शरद पवार गटाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. अजित पवार यांचे मतदारसंघातील विरोधकही या संधीचा फायदा घेऊन युगेंद्र पवार यांच्या पाठीमागे उभे राहिले आहेत. - मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मजबूत पकड आहे. त्यामुळे यूगेंद्र यांच्यासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तगडे आव्हान असणार आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्देनीरा नदीच्या प्रदूषणामुळे शेतीची सुपीकता धोक्यात आली असून शेतकऱ्यांच्या आरोग्यावरही  परिणाम झाला आहे. या संदर्भात आतापर्यंत काहीही उपाय-योजना नाहीत. उद्योग-धंदे नसल्यामुळे मतदारसंघातील तरुणाला कामासाठी इतर शहरांमध्ये जावे लागत आहे. 

२०१९ मध्ये काय घडले?अजित पवार     राष्ट्रवादी काँग्रेस (विजयी)    १,९५,६४१ गोपीचंद पडळकर       भाजप                           ३०,३७६अविनाश गोफणे      वंचित बहुजन आघाडी    ३,१११अशोक माने     -    १,४२१

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते     टक्के २०१४ अजित पवार      राष्ट्रवादी     १,५०,५८८       ६६२००९ अजित पवार    राष्ट्रवादी    १,२८,५४४    ६८२००४ अजित पवार     राष्ट्रवादी    ९६,३०२       —१९९९ अजित पवार     राष्ट्रवादी     ८६,५०७        —१९९५ अजित पवार    राष्ट्रवादी    ९१,४९३           —

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४baramati-acबारामतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Ajit Pawarअजित पवार