शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एकत्र दिवाळीचा 50 वर्षांचा पायंडा यंदा खंडित; शरद पवार गोविंदबागेत, अजित पवार काटेवाडीत करणार साजरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 09:49 IST

Maharashtra Assembly Election 2024 : शनिवारी दिवाळी पाडव्यानिमित्त गोविंदबाग येथे शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, बारामती विधानसभेचे उमेदवार युगेंद्र पवार आणि सर्व पवार कुटुंबीय हितचिंतकांना भेटणार आहेत. 

Maharashtra Assembly Election 2024 : बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार हे दिवाळीनिमित्त येथील गोविंदबागेतील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांना भेटतात. गेल्या पन्नास वर्षांपासून हा पायंडा सुरू आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी राज्यभरातून बडे राजकीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी येतात. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर आता सत्ताकेंद्र विभागले आहे. त्यामुळे दिवाळी- पाडवा शरद पवार हे गोविंदबागेत, तर अजित पवार काटेवाडीतील निवासस्थानी साजरा करणार आहेत.

शनिवारी दिवाळी पाडव्यानिमित्त गोविंदबाग येथे शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, बारामती विधानसभेचे उमेदवार युगेंद्र पवार आणि सर्व पवार कुटुंबीय हितचिंतकांना भेटणार आहेत. काटेवाडीतील निवासस्थानी अजित पवार पहिल्यांदाच भेटीगाठी घेणार आहेत. सकाळी साडेसहा वाजेपासूनच ते सर्वांना भेटणार आहेत. सुनील तटकरे व काहींचे फोन आले होते, त्यामुळे काटेवाडीत मी कार्यकर्त्यांना भेटण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

...शारदोत्सवाला अजित पवार यांची अनुपस्थितीगतवर्षी २०२३ मध्ये अजित पवार यांच्यासह सर्व कुटुंबीयांनी गोविंदबागेत दिवाळी साजरी केली. आजारपणामुळे दिवाळी-पाडव्याला उपस्थित राहणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कळवले होते. मात्र, रात्री गोविंदबागेत पत्नी सुनेत्रा पवार पार्थ व जय या दोन मुलांसोबत उपस्थित होत्या.दिवाळीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी दरवर्षीप्रमाणे पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित शारदोत्सव कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित होते.

भाऊबिजेकडे लक्ष : गतवर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भाऊबीज काटेवाडीत उत्साहात साजरी झाली होती. यंदा या भावंडांची भाऊबीज साजरी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार