शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

Maharashtra: राज्यातील २१ साखर कारखान्यांना कर्जासाठी थकहमी; १५ सत्ताधाऱ्यांचे तर ३ विरोधकांचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 11:33 IST

या १५ कारखान्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित दोन नेते, अजित पवार यांच्याशी संबंधित पाच नेते तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कारखान्याचा समावेश आहे...

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने २१ सहकारी साखर कारखान्यांना थकहमी देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ कर्ज देणार आहे. याची रक्कम अद्याप निश्चित झाली नसली तरी राजकीय नेत्यांच्या कारखान्यांवर राज्य सरकार ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मेहेरबान झाले आहे. या २१ कारखान्यांपैकी १५ कारखाने सत्ताधाऱ्यांच्या गटातील आहेत हे विशेष. तर उर्वरित ६ कारखान्यांमध्ये दोन शरद पवार, १ काँग्रेस, दोन अपक्ष व एक राजकीय संबंध नसलेला कारखाना आहे.

या १५ कारखान्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित दोन नेते, अजित पवार यांच्याशी संबंधित पाच नेते तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कारखान्याचा समावेश आहे. राज्याने एनसीडीसीकडून कर्जासाठी शिफारस केलेल्या कारखान्यांमध्ये विनय कोरे (अपक्ष आमदार) यांचा कोल्हापूरमधील तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना, प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी-अजित पवार) यांचा लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, मंत्री संदिपान भुमरे (शिवसेना-एकनाथ शिंदे) यांचा छत्रपती संभाजीनगर येथील श्री रेणुका शरद सहकारी साखर कारखाना, तसेच राष्ट्रवादीचे आमदार मकरंद जाधव पाटील यांच्या सातारा येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे दोन युनिट तसेच धाराशिवमधील काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बसवराज पाटील यांचा श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.

विरोधकांमध्ये शिरूरचे आमदार अशोक पवार यांचा (राष्ट्रवादी- शरद पवार) रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना, मानसिंगराव फत्तेसिंगराव नाईक यांचा विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना, भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचा रायगड सहकारी साखर कारखाना, शिवसेना उबाठाचे नगर जिल्ह्यातील माजी मंत्री यशवंतराव गडाख यांचा मुळा कारखाना यांचाही समावेश आहे. राजेंद्र नागवडे यांचा सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे एसएसके, सोलापूरमधील धर्मराज काडादी यांचा श्री सिद्धेश्वर यांच्या कारखान्याचाही यात समावेश आहे.

हे आहेत ते कारखाने

लोकनेते सुंदरराव सोळंके, पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर, स्वामी समर्थ, संत दामाजी, श्री वृद्धेश्वर, लोकनेते मारुतराव घुले, किसनवीर (२ युनिट), कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी, राजगड, अगस्ती, सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे, मुळा, श्री तात्यासाहेब कोरे, श्री रेणुकादेवी शरद, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे, रावसाहेब दादा पवार घोडगंगा, श्री विठ्ठलसाई, विश्वासराव नाईक, श्री सिद्धेश्वर, अंबेजोगाई.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्र