कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांचा ताेंडाला पाने पुसण्याचे काम : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 08:29 PM2019-12-22T20:29:37+5:302019-12-22T20:31:46+5:30

महाविकास आघाडीने केलेल्या कर्जमाफीवर टीका करताना शेतकऱ्यांचा सातबारा काेरा करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली.

maha vikas aghadi's loan waiver is not sufficient : ramdas athawale | कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांचा ताेंडाला पाने पुसण्याचे काम : रामदास आठवले

कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांचा ताेंडाला पाने पुसण्याचे काम : रामदास आठवले

Next

पुणे : शेतक-यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा करत शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस या तीन पक्षांनी महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले आहे. पण आता केवळ दोन लाख रुपयांचे कर्जमाफ करण्याची घोषणा करुन सरकारने शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान महामंडळांवर तीन वर्षांसाठी नियुक्त केलेल्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या महाविकासआघाडी सरकारकडून खंडीत करणार असल्याची चर्चा आहे. परंतु कायद्यानुसार या नियुक्त्या देण्यात येत असून, सरकार बदलले म्हणून नियुक्त्या रद्द करणे चुकीचे आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारने तसे केल्यास शासनाच्या विरोधात न्यायालयात जाऊ असा इशारा देखील त्यांनी दिला.

रिपाइच्या (आठवले ) राज्य कार्यकारीणीची बैठक रविवारी पुण्यात अल्पबचत भवन येथे पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बाेलत हाेते. आठवले म्हणाले, काँग्रेस आणि शिवसेनेत वीर सावरकरांवरून मतभेद आहेत. दोन्ही भिन्न विचारधारेचे पक्ष असल्याने त्यांच्यात पुन्हा-पुन्हा मतभेदाचे मुद्दे येत राहतील. त्यामुळे त्यांनी वेगळे व्हायला हवे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र येत सरकार स्थापन करावे, असे वाटते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा मोठाच प्रश्न आहे.     

दरम्यान केंद्र शासनाने मंजूर केलेले नागरिकत्व दुरुस्ती कायदा भारतातील मुस्लिमांच्या विरोधात नाही. सध्या विधेयकाच्या गैरसमजुतीतून आंदोलने सुरु असून, काँगेस्र मुस्लिम लोकांना भडकविण्याचे काम करीत आहे. आपल्या देशात हिंसक आंदोलन होणे योग्य नाही, विधेयक पारित होत असताना अमित शहा यांनी देशातील मुस्लिमांना यामुळे कोणताही त्रास होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आंदोलन करणे थांबवावे असे आवाहन आठवले यांनी केले. 

आंबेडकरी विचारांचा नक्षलवादी विचारांशी संबंध नाही
एल्गार परिषदेत नक्षलवादी विचारांचे लोक होते, हे पुढे आले आहे. भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद हे दोन वेगळे विषय आहेत. आम्ही आंबेडकरवादी आहोत. आंबेडकरी विचारांचा नक्षलवादी विचारांशी संबध नाही. हिंसेला हिंसेने उत्तर योग्य नाही. दोषींवर कारवाई व्हावी. एल्गार प्रकरणी पोलिसांनी निपक्ष चौकशी करावी. नक्षलवाद्यांनी आंबेडकरवाद स्वीकारल्यास त्यांचे कल्याणच होईल, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे  सांगितले.

Web Title: maha vikas aghadi's loan waiver is not sufficient : ramdas athawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.