महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
By प्रशांत बिडवे | Updated: May 8, 2024 22:05 IST2024-05-08T22:04:23+5:302024-05-08T22:05:29+5:30
एलएलबी (पाच वर्षे) सीईटी २२ मे रोजी तर एमएच-नर्सिंग सीईटी २८ मे राेजी होणार

महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
प्रशांत बिडवे, लाेकमत न्यूज नेटवर्क, पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष सीईटी सेल तर्फे विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेचे सुधारित वेळापत्रक बुधवारी प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार एलएलबी (पाच वर्षे) सीईटी दि. २२ मे आणि एमएच- नर्सिंग सीईटी दि. २८ राेजी आयाेजन केले आहे. यंदा पहिल्यांदाच आयाेजित केली जाणारी महा-बीबीसीए/ बीबीए/ बीएमएस/ बीबीएम/ एमबीए (इंटीग्रेटेड) आणि एमसीए (इंटीग्रेटेड) सीईटी दि. २९ मे राेजी हाेणार आहे.
सीईटी सेलने संकेतस्थळावर सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र अप्लाईड आर्टस ॲन्ड क्राफ्टस सीईटी दि. १२ मे, बी.ए./ बीएसस्सी बी.ए. (चार वर्षे संयुक्त काेर्स) सीईटी : दि. २४ मे, बीएचएमसीटी आणि एमएचएमसीटी (इंटीग्रेटेड) सीईटी : दि. २४ मे, एमएच डीपीएन / पीएचएन सीईटी आणि एम.प्लानिंग (इंटिग्रेटेड) सीईटी परीक्षा दि. २५ मे राेजी आयाेजित केल्या आहेत. महा पीजीपी सीईटी/ पीजीओ सीईटी/ एमएसस्सी (ए ॲन्ड एसएलपी) आणि एमएसस्सी (पी ॲन्ड ओ) सीईटीची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे सीईटी सेलतर्फे कळविण्यात आले आहे.