स्फोटासारख्या आवाजाने पुरंदर परिसर हादरला

By Admin | Updated: June 30, 2017 01:34 IST2017-06-30T01:34:05+5:302017-06-30T01:34:05+5:30

पूर्व पुरंदरच्या पट्ट्यात बुधवारी रात्री नऊच्या सुमारास मोठा स्फोट झाल्याचा आवाज झाला. यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते.

The magnitude of the explosion shook the purandar campus | स्फोटासारख्या आवाजाने पुरंदर परिसर हादरला

स्फोटासारख्या आवाजाने पुरंदर परिसर हादरला

लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी (पुणे) : पूर्व पुरंदरच्या पट्ट्यात बुधवारी रात्री नऊच्या सुमारास मोठा स्फोट झाल्याचा आवाज झाला. यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. गुरुवारी दिवसभर या आवाजाची चर्चा होती.
एकाच वेळी २० किलोमीटरच्या परिसरात मोठा आवाज व धक्का जाणवला. हा विजेचा आवाज नसल्याचे काही जणांनी सांगितले. प्रचंड स्फोटांसारख्या झालेल्या आवाजाने खेडोपाड्यातील नागरिक भीतीने रात्रभर जागे होते. काही गावांमध्ये अफवांचे पीकही आले. दीड वर्षांपूर्वीही अशाच स्फोटांसारखा आवाजाने पुरंदरला हादरा बसला होता. तेव्हाही आवाजाचे गूढ उकलले नव्हते, असे ग्रामस्थांनी सांगितले. या आवाजाबाबत प्रशासनाकडेही कसलीच माहिती नव्हती.

Web Title: The magnitude of the explosion shook the purandar campus