माढ्यात मोठी राजकीय घडामोड होणार? 'शरद पवारांपासून दूर गेलेले परत येणार', जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 10:10 AM2024-03-20T10:10:03+5:302024-03-20T10:11:46+5:30

भाजपने माढामध्ये पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, माढामधून धैर्यशील मोहिते पाटीलही इच्छूक आहेत.

Madha lok sabha Those who are away from Sharad Pawar will come back Jayant Patil's clear indication | माढ्यात मोठी राजकीय घडामोड होणार? 'शरद पवारांपासून दूर गेलेले परत येणार', जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत

माढ्यात मोठी राजकीय घडामोड होणार? 'शरद पवारांपासून दूर गेलेले परत येणार', जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत

मुंबई-  देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. भाजपने राज्यातील पहिली यादीही जाहीर केली असून आता माढा लोकसभा मतदार संघात उमेदवारीसाठी वाद असल्याचे समोर आले आहे. भाजपने माढामध्ये पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, माढामधून धैर्यशील मोहिते पाटीलही इच्छूक आहेत. उमेदवार यादीत नाव नसल्यामुळे ते नाराज असल्याचे चर्चा सुरू आहे. दोन दिवसापूर्वी रामराजे नाईक निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील यांची विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत बैठक झाली. या भेटीनंतर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्यापासून दूर गेलेले रामराजे नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा पवारांसोबत येणार असल्याचे स्पष्ट संकेत शेकापचे जयंत पाटील यांनी दिले आहेत. 

काँग्रेसने दिल्लीत फॉर्म्युला ठरवला, शरद पवारांना ६ जागा; वंचितच्या प्रस्तावावर चर्चाच नाही

काल शेकापचे जयंत पाटील पुणे दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी हे संकेत दिले आहेत. जयंत पाटील म्हणाले, माढा मतदार संघात चांगलं वातावरण सुरू आहे. १८ ते ३० वर्षाचे तरुण शरद पवार यांच्या पाठिमागे आहेत.अकलूजला झालेली अवस्था म्हणजे बंडखोरी नाही, ते आमचेच लोक आहेत. माढ्यात आम्ही डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासाठी मागणी केली आहे. माढ्यात काहीतरी बदल होईल, मी याबद्दल बोलत नाही, मी छोटा माणूस आहे. शरद पवार यांच्यापासून दूर गेलेले नेते परत येतील, असे स्पष्ट संकेत जयंत पाटील यांनी यावेळी दिले. 

"माढ्यात मी दर महिन्याला जोतो, काल मी विजयसिंह मोहिते पाटील यांना सहज भेटायला गेलो तेव्हा सगळेच आले होते. पूर्ण महाराष्ट्र वेगळ्याच भूमिकेत आहे. १९७७ च्या निवडणुकीसारखी आता परिस्थिती होणार आहे, असं मला वाटतं. मावळमध्ये वाघेरे निवडणून येतील, असंही पाटील म्हणाले. अकलूज महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सेंटर पॉइंट होऊ शकतो, असंही पाटील म्हणाले. 

Web Title: Madha lok sabha Those who are away from Sharad Pawar will come back Jayant Patil's clear indication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.