भोर प्रीमियर लीगमध्ये एम. बी. स्ट्रायकर्श संघ अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST2021-02-05T05:06:51+5:302021-02-05T05:06:51+5:30

द्वितीय क्रमांक बक्षीस ५१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह मैत्री प्रतिष्ठानच्या संघाला विक्रम चव्हाण यांचे हस्ते तर तृतीय क्रमांकाचे ...

M. in the Bhor Premier League. B. Strikers team tops | भोर प्रीमियर लीगमध्ये एम. बी. स्ट्रायकर्श संघ अव्वल

भोर प्रीमियर लीगमध्ये एम. बी. स्ट्रायकर्श संघ अव्वल

द्वितीय क्रमांक बक्षीस ५१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह मैत्री प्रतिष्ठानच्या संघाला विक्रम चव्हाण यांचे हस्ते तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक डॅशिंग दिलदार संघाला गणेश व सुनील आवाळे यांचे हस्ते २१ हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, तर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक नरवीर योद्धा संघाने पटकावले असून, त्यांचा रोख ११ हजार देऊन विशाल गव्हाणे यांचे हस्ते संघाला गौरवण्यात आले. या सामन्यांसाठी सर्व ट्राॅफीज भोर प्रिमियर लीगचे अध्यक्ष राजाराम आवाळे, सचिव मनोज शेटे, धनंजय आवाळे, वैभव म्हेत्रे यांचेतर्फे देण्यात आल्या.

माजी क्रिकेट खेळाडू प्रा. एन. टी. वाघ, रवींद्र आवाळे यांचा दत्तात्रय खोपडे यांचेतर्फे करंडक देऊन सन्मान करण्यात आला. सामने यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोहन मोरे, अजिंक्य बाठे, सचिन शिवतरे, विजय सुरगुडे, समीर वर्पे, नीलेश पवार, विनायक देवघरे, गणेश तनपुरे, माऊली आवाळे, मंगेश कुंभार, गणेश वालगुडे यांनी मोठी मेहनत घेतली असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोर प्रिमीयर लीगचे उपाध्यक्ष अनंता शिर्के यांनी केले, तर आभार सचिव चंद्रकांत मळेकर यांनी मानले.

३१ भोर

क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण करताना आमदार संग्राम थोपटे.

Web Title: M. in the Bhor Premier League. B. Strikers team tops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.