शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भीषण! कारला धडकून लक्झरी बस पलटली; हॉटेलच्या पार्किंगमध्ये घुसली, २५ प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 10:23 IST

कारच्या धडकेनंतर उलटलेली बस थेट हॉटेलच्या पार्किंगमध्ये घुसली; कार चालकाचा जागीच मृत्यू

पुणे: पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. कारच्या धडकेनंतर लक्झरी बस पलटली. काल रात्री सव्वा अकराच्या सुमारास शिरुर येथील बजरंगवाडी येथे झालेल्या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले. कारची धडक बसल्यानंतर बस चालकाचं नियंत्रण सुटलं. ती एका बाजूला उलटली आणि घासत घासत एका हॉटेलच्या पार्किंगपर्यंत गेली. त्यामुळे पार्किंगमधील काही कारचं नुकसान झालं. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

पुणे-अहमदनगर महामार्गावर पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर एका कार चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार दुभाजकावर धडकली. अपघात इतका भीषण होता की, कार पुढे जाऊन अहमदनगरच्या दिशेनं चाललेल्या लक्झरी बसला धडकली. धडक जोरात बसल्यानं बस उजव्या बाजूला उलटली. त्यानंतर ती रस्त्याला घासत एका रस्त्याच्या शेजारी असलेल्या रॉयल पॅलेसच्या दरवाज्यापर्यंत पोहोचली. हॉटेलसमोरच्या पार्किंगमध्ये अनेक कार उभ्या होत्या. पलटलेली बस कार्सना धडकली. त्यामुळे काही कार्सचं नुकसान झालं. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर २५ प्रवासी जखमी झाले.