शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पुण्यात भरधाव कारचा भीषण अपघात; दोन्ही पाय अडकलेल्या अल्पवयीन चालकाची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 14:46 IST

याबाबत अग्निशमन दलाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, एक आलिशान गाडीतून दोन १७ वर्षाची मुले पहाटे अडीच वाजता वेगाने डी पी रोडवरुन म्हात्रे पुलाकडे येत होते. वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटून तिने दुभाजकाला धडक दिली.

पुणे : भरधाव जाणाऱ्या आलिशान बीएमडब्लू कारने पहाटेच्या सुमारास म्हात्रे पुलाजवळील डी. पी. रोडवरील दुभाजकाला धडक दिली. आलिशान गाडीतील सोयीमुळे वेळीच त्यातील एअरबॅग उघडून चालक व त्याच्या शेजारी बसलेल्यांचे प्राण वाचले. मात्र, ही धडक इतकी जोरात होती की, या गाडीचे संपूर्ण इंजिन आत घुसल्याने त्यात अल्पवयीन चालकाचे पाय अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडीचा पुढचा भाग कापून या मुलाची सुटका केली. या गाडीतील दोन्ही १७ वर्षाच्या मुलांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अग्निशमन दलाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, एक आलिशान गाडीतून दोन १७ वर्षाची मुले पहाटे अडीच वाजता वेगाने डी पी रोडवरुन म्हात्रे पुलाकडे येत होते. वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटून तिने दुभाजकाला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, या आलिशान गाडीचे इंजिन आत एअरबॅगमुळे गाडीतील दोघांचे प्राण वाचले. पण चालक युवकाचे दोन्ही पाय अडकले होते.

अग्निशमन दलाला याची खबर पहाटे अडीच वाजता मिळाल्यावर एरंडवणा फायर स्टेशनची गाडी रवाना झाली. तसेच मुख्य केंद्रातून रेस्क्यु व्हॅन घटनास्थळी पोहचली. अग्निशमन दलाचे अधिकारी जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रेडर व कटरच्या सहाय्याने गाडीच्या इंजिनाने पार्ट कापून काढले. गाडीचा पुढचा भाग मागे ओढून तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी या अल्पवयीन चालकाची सुटका केली.

याबाबत अग्निशमन दलाचे मंगेश मिलावणे यांनी सांगितले की, गाडीने दुभाजकाला इतकी जोरात धडक दिली होती की, चालकाच्या बाजूची संपूर्ण साईट आत घुसली होती. चाक निखळले होते. कटरने गाडीच्या इंजिनाचा भाग कापून तसेच पुढचा भाग ओढून काढल्यावर मुलाची सुटका करण्यात यश आले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातDP Road Mehkarडीपी रोड मेहकर