शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Pune | आळंदी परिसरात धर्मांतरासाठी आर्थिक मदतीचे आमिष; चौदा जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 12:34 IST

विशेष म्हणजे धर्मांतरबंदी कायद्यासाठी शनिवारी (दि.१५) आळंदीत विराट जनमोर्चा काढण्यात आला होता...

आळंदी (पुणे) : आळंदी व शहरालगतच्या गावांमध्ये सध्या धर्मांतरासाठी नागरिकांना जबरदस्ती केल्याचे समोर येत आहे. दहा दिवसांपूर्वी आळंदी परिसरात येशूचे रक्त म्हणून द्राक्षाचं लाल सरबत पाजून धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असताना आता पुन्हा एकदा आर्थिक मदतीचे आमिष दाखवून धर्मांतर करत असल्याचा प्रकार रविवारी (दि.१६) मरकळ गावात घडला आहे. विशेष म्हणजे धर्मांतरबंदी कायद्यासाठी शनिवारी (दि.१५) आळंदीत विराट जनमोर्चा काढण्यात आला होता. त्याच्याच दुसऱ्या दिवशी लगतच्या गावांमध्ये धर्मांतरासाठी प्रयत्न केले जात असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात प्रदीप मधुकर वाघमारे (चऱ्होली), प्रशांत मधुकर वाघमारे (वय ३०), रोनक शैलेश शिंदे (वय १८ रा.भोसरी), अशोक मुकेश पांढरे (वय १९ भोसरी), मुकेश जयकुमार विश्वकर्मा (वय २५ रा.भोसरी), लक्ष्मण श्रीरंग नायडू (वय ३५ रा.भोसरी), म्यूंगी व्युयुंग वुन (वय ३८ रा. भोसरी), ज्युईल वोमन युन (वय ३६), ईशा भाऊसाहेब साळवे (वय १९) या तीन महिला व एक अल्पवयीन मुलगी अशा एकूण चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रसाद भाऊसाहेब साळुंखे (वय २५ रा. मरकळ) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांच्या गावातील लोकांच्या घरासमोर जाऊन तुम्ही बायबल वाचता का, चर्चमध्ये या, आम्ही तुम्हाला धंद्याला आर्थिक मदत करू असे आमिष दाखवून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान याबाबतचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टॅग्स :AlandiआळंदीPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस