शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Grand Tour : ल्यूक मडग्वे ठरला पुणे ग्रॅण्ड टूरचा विजेता;‘ली निंग स्टार’ संघ विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 09:29 IST

- दोन टप्प्यातील विजेतेपदासह ल्यूक मडग्वेने संपूर्ण पुणे ग्रॅण्ड टूरचा विजेता ठरला. ली निंग स्टार संघाने सांघिक विजेतेपद पटकावले.

- उमेश गो. जाधव

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक भागातून मार्गस्थ झालेल्या पुणे ग्रॅण्ड टूर सायकल स्पर्धेच्या ९५ किमी अंतराच्या अखेरच्या ‘पुणे प्राइड लूप’मध्ये शुक्रवारी ली निंग स्टार संघाच्या श्नायर्को ॲलिक्सेईने (१ तास ५६ मिनिटे ५४ से.) अव्वल क्रमांक पटकावला. दोन टप्प्यातील विजेतेपदासह ल्यूक मडग्वेने संपूर्ण पुणे ग्रॅण्ड टूरचा विजेता ठरला. ली निंग स्टार संघाने सांघिक विजेतेपद पटकावले.

चौथ्या टप्प्यात सायकलस्वारांनी शहराच्या मध्य भागातून ९५ किलोमीटरचा प्रवास केला. ५७८ मीटरचा चढ पार करून ही शर्यत पुण्याच्या अनेक ऐतिहासिक रस्त्यांवरून आणि शनिवारवाड्यासारख्या वास्तूच्या जवळून गेली. चार टप्प्यांत सायकलस्वारांनी ४३७ किलोमीटर अंतर पार केले. यात ली निंग स्टार संघाने २८ तास ४१ मिनिटे १९ सेकंद अशा एकत्रित वेळेसह संघ क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ल्यूक मडग्वे याच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर चीनच्या या संघाने सर्व चार टप्प्यांवर आपले वर्चस्व राखले. स्पेनचा बर्गोस बर्पेललेट बीएच संघ (२८ तास ४२ मिनिटे ०९ से.) दुसऱ्या, तर मलेशियाचा तेरेंगानू सायकलिंग संघ (२८ तास ४८ मिनिटे १९ से.) तिसऱ्या स्थानावर राहिला. शुक्रवारी चौथ्या टप्प्यात ‘ली निंग स्टार’ संघाच्या ॲलिक्सेईने बाजी मारली. त्याचा सहकारी कॅमेरून निकोलस स्कॉट याने दुसऱ्या क्रमांकावर शर्यत पूर्ण केली, तर ‘रुजाई इन्शुरन्स विनस्पीड’ संघाच्या डायलन हॉपकिन्स याने तिसरे स्थान मिळवले.

पाच खंडांतील ३५ देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २९ संघांमधील १६४ सायकलपटूंविरुद्ध स्पर्धा करताना ल्यूक मडग्वेने एकूण ९ तास ३३ मिनिटे ०४ सेकंद अशा एकूण वेळेत ही शर्यत पूर्ण केली. थायलंडच्या ‘रुजाई इन्शुरन्स विनस्पीड’ संघाचा आणि ल्यूकचा सर्वांत जवळचा स्पर्धक एलन कार्टर बेटल्स केवळ १४ सेकंदांनी मागे राहिला, तर बेल्जियमच्या ‘टार्टेलेटो-आयसोरेक्स’ संघाचा योर्बेन लॉरीसेन ३३ सेकंदांच्या फरकाने तिसऱ्या स्थानावर राहिला.

ल्यूकने पहिल्या दिवशी ‘मुळशी-मावळ माइल्स’च्या टप्प्यात ‘यलो जर्सी’ जिंकली आणि शेवटपर्यंत ती आपल्याकडेच राखली. अखेपर्यंत निर्विवाद वर्चस्व राखत ल्यूकने या स्पर्धेचा यशस्वी शेवट केला.

सांघिक कामगिरीमुळेच जेतेपद : ल्यूक मडग्वे

सर्वसाधारण विजेतेपद पटकावल्यानंतर ल्यूकने वैयक्तिक कौशल्यापेक्षा सामूहिक प्रयत्नांना विजयाचे श्रेय दिले. तो म्हणाला की, माझा संघ खरोखरच खूप चांगला आहे. त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझी काळजी घेतली. तुम्ही गेल्या दोन दिवसांत पाहिल्याप्रमाणे, आमच्या इतर दोघांनी विजय मिळवला. त्यामुळे आम्ही तीन वेगवेगळ्या सहकाऱ्यांसह विजय मिळवले आहेत आणि आजचा हा विजय मिळवण्यासाठी खूप कष्ट, सांघिक काम, भरपूर सराव आणि तासन्तास दिलेला वेळ या सर्वांचे योगदान आहे. त्यामुळे, हा विजय माझ्या संघासाठी आहे. ल्यूकला पुण्यात मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे पुण्याच्या गर्दीने तो विशेष प्रभावित झाला होता. तो पुढे म्हणाला, ‘आजचा दिवस खरोखरच अप्रतिम होता. मी याआधी कधीही अशी गर्दी पाहिली नव्हती. मला पुढच्या वर्षी पुन्हा इथे यायला नक्कीच आवडेल.

‘युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल’च्या महासंचालक अमिना लानाया म्हणाल्या की, भारताचा अभिमान वाटावा असा हा सोहळा होता. पहिल्याच आयोजनात भारताने जागतिक दर्जाची शर्यत यशस्वी करून दाखवली आहे. विजेत्यांना अभिनेता आमिर खानच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय सायकलिंग संघटनेच्या महासंचालक अमिना लानाया, आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष दातो अमरजितसिंग गिल, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार, पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, बजाज ऑटोचे कर विभागाचे उपाध्यक्ष चेतन जोशी उपस्थित होते.

इ्तर विजेते :

पोलका डॉट जर्सी (किंग ऑफ द माउंटेन्स) : क्लेमेंट अलेनो (बर्गोस बर्पेललेट बीएच संघ)

ऑरेंज जर्सी (सर्वोत्कृष्ट आशियाई सायकलस्वार) : जंबलजाम्ट्स सैनबायर (बर्गोस बर्पेललेट बीएच संघ)

व्हाइट जर्सी (सर्वोत्कृष्ट युवा सायकलस्वार) : तिज्सेन विगो (नेदरलँड्स)

ब्लू जर्सी (सर्वोत्कृष्ट भारतीय सायकलस्वार) : हर्षवीर सिंग सेखॉन

सर्वोत्तम तीन भारतीय : हर्षवीरसिंग सेखॉन, मानव सारडा, दिनेश कुमार

English
हिंदी सारांश
Web Title : Luke Mudgway wins Pune Grand Tour; Li Ning Star team victorious.

Web Summary : Luke Mudgway won the Pune Grand Tour cycling race. Li Ning Star team secured the team title after a 437 km race. Indian cyclist Harshveer Singh Sekhon shined.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र