शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

LPG Gas Crisis: ‘पीएनजी’ला अपेक्षित दाब नसल्याने लघुउद्याेगांसाठी ‘एलपीजी’च प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 14:51 IST

- एमआयडीसीतील उद्योगांसमोर गॅस टंचाईचे संकट कायम : फॅब्रिकेशन उद्योगांमध्ये लोखंड कापणे, वेल्डिंग, हिटिंग आणि मेटल शेपिंगसाठी उच्च दाबाच्या ज्वाळेची आवश्यकता

- गोविंद बर्गे 

पिंपरी :पिंपरी-चिंचवड एमआयडीसी परिसरात सध्या ‘एलपीजी’ची टंचाई तीव्र झाली असून, त्यावर उपाय म्हणून ‘एमएनजीएल’कडून पाईपने गॅस (पीएनजी) देण्यासाठी एमआयडीसी कार्यालयात शिबिर झाले. मात्र, फॅब्रिकेशनसह लोखंड कापण्याचे काम करणाऱ्या उद्योगांसाठी ‘पीएनजी’ हा पर्याय फारसा उपयुक्त ठरत नसल्याचे समोर आले आहे.

एमआयडीसीतील अनेक लघू व मध्यम उद्योगांमध्ये द्रवीभूत पेट्रोलियम गॅसचा (एलपीजी) मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. विशेषतः फॅब्रिकेशन उद्योगांमध्ये लोखंड कापणे, वेल्डिंग, हीटिंग आणि मेटल शेपिंगसाठी उच्च दाबाच्या ज्वाळेची आवश्यकता असते. एलपीजी सिलिंडरमधून मिळणारा दाब आणि ज्वाळेची तीव्रता या प्रक्रियेसाठी अत्यावश्यक असते. लोखंड कापण्यासाठी ‘ऑक्सी-एलपीजी कटिंग’ पद्धत वापरली जाते. यामध्ये एलपीजी गॅस उच्च दाबाने जळून तीव्र ज्वाळा निर्माण करतो, त्यामुळे जाड लोखंडी पत्रे व ढाचे सहज कापता येतात. सतत आणि नियंत्रित दाबामुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहते.

याउलट पीएनजी (पाइप्ड नॅचरल गॅस) कमी दाबाने पुरविला जातो. त्यामुळे फॅब्रिकेशनसारख्या उद्योगांमध्ये आवश्यक असलेली उच्च तापमानाची ज्वाळा तयार होत नाही. परिणामी, लोखंड कापण्याची प्रक्रिया मंदावते किंवा पूर्णपणे शक्य होत नाही. काही उद्योगांनी पीएनजी वापरून पाहिले असता अपेक्षित परिणाम मिळाला नसल्याचेही समोर आले आहे. विशेषतः ज्या कंपन्यांचे काम पूर्णपणे गॅस कटिंग आणि जड फॅब्रिकेशनवर अवलंबून आहे, त्यांना ‘पीएनजी’चा फायदा होत नाही.

 एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये दोन किलो दाबाच्या गॅसची गरज भासते. एलपीजी गॅसमध्ये तो असतो. पीएनजीमधून तो मिळत नसल्याने प्रेशर मिळण्यासाठी एखाद्या तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल का, याचाही विचार सुरू आहे. - सतीश जाधव, उद्योजक, फॅब्रिकेशन इंडस्ट्रीज. एलपीजी गॅसटंचाईबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. येथील ९० टक्के लघुउद्योगांना एलपीजीची गरज आहे. अपेक्षित दाब मिळत नसल्याने पीएनजीचा उपयोग होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. यावर काही तोडगा काढता येईल का, यासाठी एमएनजीएल अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आश्वासन उद्योगमंत्र्यांनी दिले आहे. - संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना 

येथील काही उद्योगांमध्ये प्रोफाइल कटिंगसारख्या प्रक्रियांसाठी एलपीजीचा वापर होत असून, तेथे नैसर्गिक वायूचा पर्याय वापरण्याची शक्यता तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एमएनजीएलकडून ३५० मिलिबार किंवा दोन बार दाबाने पीएनजी पुरवठा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.  - प्रवीण गायकवाड, उपमहाव्यवस्थापक (विपणन), एमएनजीएल

English
हिंदी सारांश
Web Title : LPG preferred for small industries due to PNG pressure issues.

Web Summary : Pimpri-Chinchwad's industries face LPG shortage. PNG is unsuitable for fabrication due to low pressure, hindering metal cutting. Businesses need high-pressure LPG for operations.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाई