इराण युद्धाचा फटका आता घरातील एलपीजी गॅसलाही बसू लागला आहे. सरकारने एलपीजी टंचाईवर मात करण्यासाठी उद्योग, हॉटेलना गॅस सिलिंडर बंद करून घरगुती ग्राहकांना प्राथमिकता देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू, पुण्यात आज विविध गॅस एजन्सींसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, नागरिक अक्षरशः रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यातील विविध गॅस एजन्सींसमोर सकाळपासूनच ग्राहकांच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, ऑनलाइन किंवा फोनवरून बुकिंग करूनही सिलिंडर मिळत नसल्याने गृहिणींचे बजेट आणि स्वयंपाकघर दोन्ही कोलमडले आहे.
गर्दीची दोन मुख्य कारणेअनेकांनी गॅस बुकिंग केले आहे, मात्र 'स्टॉक संपला आहे' किंवा 'पुरवठा उशिरा होत आहे' अशी उत्तरे एजन्सीकडून दिली जात आहेत. इराण-इस्रायल युद्धामुळे कमर्शिअल गॅससोबतच घरगुती पुरवठ्यावरही परिणाम झाल्याची चर्चा असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ई-केवायसी : शासनाने गॅस जोडणीसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना प्रत्यक्ष गॅस एजन्सीवर जावे लागत आहे. त्यातच सर्व्हर डाऊन होणे किंवा अंगठ्याचे ठसे न जुळणे या तांत्रिक अडचणींमुळे तासनतास रांगेत उभे राहूनही काम होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
अनेकांना आता जाग आली...
अनेकांकडे एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन आहेत. आतापर्यंत गरज नसल्याने एकच कनेक्शन वापरले जात होते. इराण युद्धामुळे एलपीजी गॅसची टंचाई झाल्याचे समजताच आता लोकांना दुसऱ्या न वापरात असलेल्या गॅस कनेक्शनची आठवण झाली आहे.
Web Summary : Pune faces LPG cylinder shortages despite bookings. E-KYC requirements and Iran-Israel war fears exacerbate long agency lines. Citizens are frustrated by stock issues and technical difficulties, prompting a rush to activate dormant gas connections.
Web Summary : पुणे में बुकिंग के बावजूद एलपीजी सिलेंडर की कमी। ईरान-इजराइल युद्ध के डर से ई-केवाईसी के लिए लंबी कतारें लगी हैं। स्टॉक की कमी और तकनीकी दिक्कतों से नागरिक परेशान हैं, जिससे निष्क्रिय गैस कनेक्शन सक्रिय करने की होड़ मची है।