शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

६०० किमी चालत आलेल्या शेतकऱ्याची निष्ठा सफळ;शरद पवारांनी भेटीसाठी दिला तब्बल दीड तास वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 19:15 IST

घरात एक पांडुरंगाचा आणि दुसरा पवार साहेबांचा फोटो आहे असे सांगत त्यांनी त्यांची पवारांवरील निष्ठा अधोरेखित केली.

प्रशांत ननावरे -

बारामती:  ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे अनेक समर्थक आहेत. पवारांवरील निष्ठा,प्रेम वेळोवेळी त्यांचे खंदे समर्थक वेगवेगळ्यामार्गाने व्यक्त करतात. नुकताच पार पडलेल्या  त्यांच्या ८० वा वाढदिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यातआल्या. मात्र, ६०० किमी अंतरावरुन शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत आलेला शेतकरी यावेळी चर्चेचा विषय ठरला. याबाबत माहिती समजल्यानंतर  पवार यांनी त्याला भेटीचे आमंत्रण देत त्या शेतकऱ्याबरोबर दिड तास वेळ देत त्याच्या निष्ठेचा सन्मान केला. हाच सन्मान आज दिवसभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

संजय खंदार देशमुख (रा.जवळा,ता.अरणी,जि.यवतमाळ) असे या ज्येष्ठ शेतकऱ्याचे नाव आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे हे गाव आहे. देशमुख  यांच्यानंतर बळीराजासाठी महत्वाचे निर्णय शरद पवार यांनीच घेतले.त्यांनी घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे देशमुख यांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल झाला.त्यामुळे पवार यांच्याविषयी शेतकरी देशमुख यांच्या मनात अढळ स्थान निर्माण झाले.त्यामुळे  यंदाच्या वाढदिवशी   शरद पवारांना भेटायचच, हे मनाशी पक्क ठरवून ते जवळा गावातून थेट चालत बारामतीच्या दिशेने निघाले. तीव्र इच्छाशक्तीमुळे वयाच्या ५४ व्या वर्षी  देशमुख हे तब्बल ११ दिवस जवळपास ६३० कि.मी.चे अंतर चालून ११ डिसेंबरला बारामतीत पोहोचले.

या दिवशी पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी उपस्थित नव्हते.त्यामुळे शेतकरी देशमुख पवारांच्या मूळ गावी काटेवाडीत पोहचले.गावकरी देशमुख यांची निष्ठा पाहुन भारावले.त्यांनी  देशमुख यांचा मोठा सन्मान केला.यावेळी शेतकरी देशमुख यांची पवार यांची भेट घेण्याची तीव्र इच्छा काटेवाडी येथे वास्तव्यास असणारे   संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे यांना सांगितली. त्यानंतर काटे यांनी थेट पवार यांच्याशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली. पवार यांनी देखील शेतकरी देशमुख यांच्या निष्ठेचा मान राखत भेटीची वेळ दिली.पवार यांचे स्वीय सहायक सतीश राऊत यांनी काटे यांना संपर्क साधत पुणे शहरातील मोदी बागेतील निवासस्थानी वेळ दिल्याचे सांगितले.

त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष प्रविण गायकवाड,काटे शेतकरी देशमुख यांना घेवुन मोदीबागेतील पवारांच्या निवासस्थानी मंगळवारी(दि १५) पोहचले. यावेळी पवार यांनी शेतकरी देशमुख यांना तब्बल दीड तासांचा वेळ दिला. त्यांची आस्थेने चौकशी केली. पवार यांच्या भेटीनेभारावलेल्या देशमुखांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहिले. या भेटीने आयुष्याचे सार्थक झाले. घरात एक पांडुरंगाचा आणि दुसरा पवार साहेबांचाफोटो आहे असे सांगत त्यांनी त्यांची पवारांवरील निष्ठा अधोरेखित केली.पवार यांनी देखील त्यांच्या निष्ठेचा सन्मान केल्याने देशमुखांची ६०० किमीचा प्रवास खऱ्या अर्थाने सार्थक ठरला.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारFarmerशेतकरी