शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
4
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
5
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
6
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
7
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
8
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
9
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
10
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
11
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
12
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
13
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
14
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
15
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
16
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
17
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
18
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
19
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
20
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान

कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर ओक्खी चक्रीवादळात; लक्ष्यद्वीप समुहाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 4:38 PM

बंगालच्या उपसागरात दक्षिण श्रीलंकाजवळ बुधवारी सकाळी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर आता ओक्खी चक्रीवादळात झाले आहे़.

ठळक मुद्देदक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडु, निकोबार द्वीप समूह येथे जोरदार वृष्टी होण्याची शक्यतामच्छीमारांना पुढील ४८ तास समुद्रात न जाण्याचा इशारा

पुणे : बंगालच्या उपसागरात दक्षिण श्रीलंकाजवळ बुधवारी सकाळी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर आता ओक्खी चक्रीवादळात झाले असून त्याचा श्रीलंका, लक्ष्यद्वीप समुहाला धोका निर्माण झाला आहे़ यामुळे दक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडु, निकोबार द्वीप समूह येथे जोरदार वृष्टी होण्याची शक्यता आहे़ सध्या हे चक्रीवादळ कन्याकुमारीपासून १७० किलोमीटर, निकोबार बेटापासून ६०० किलोमीटर दूर असून श्रीलंकेच्या गाले येथून २४० किलोमीटर दूर आहे़ हे चक्रीवादळ येत्या १२ तासात ते पश्चिम उत्तरेच्या दिशेने श्रीलंकेकडे सरकण्याची शक्यता आहे़ हे चक्रीवादळ जस जसे जमिनीकडे येत जाईल तस तशी त्याची तीव्रता वाढत जाण्याची शक्यता आहे़ या चक्रीवादळाचा परिणाम पुढील तीन दिवस दिसून येणार आहे़ या चक्रीवादळामुळे दक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडु परिसरात पुढील २४ तास ताशी ५५ ते ६५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे़ 

 

झाडे कोसळण्याची शक्यताचक्रीवादळ, पाऊस व वेगाने वाहणारे वारे यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे़ घरे, रस्ते तसेच विद्युत तारा यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे़ त्याचबरोबर पिके, झाडे पडून नुकसान होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ मच्छीमारांना पुढील ४८ तास समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे़ 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र