शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

प्रेयसीला लॉजच्या बाथरूममध्ये कोंडले; दीड वर्षाच्या मुलाला घेऊन प्रियकर फरार, पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 10:25 IST

पुणे : प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करून पळून नेणाऱ्या प्रियकराचा सहकारनगर पोलिसांनी लातूरपर्यंत माग काढून ...

पुणे : प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करून पळून नेणाऱ्या प्रियकराचा सहकारनगर पोलिसांनीलातूरपर्यंत माग काढून त्याला पकडले. मुलाची सुखरूप सुटका केली. सुनील सोपान पांढरे (वय २६, रा. पांढरेवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी एका २७ वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला आणि पांढरे एकाच कंपनीत काम करीत असल्याने परिचय झाला. ते पुणे सातारा रोडवरील एका लॉजमध्ये १ ते ३ एप्रिलपर्यंत मुक्कामाला होते. त्यांच्याबरोबर फिर्यादी यांचा दीड वर्षाचा मुलगाही होता. मंगळवारी सकाळी त्यांच्यात वाद झाला. तेव्हा पांढरे याने या महिलेला बाथरूममध्ये कोंडले आणि तिच्या मुलाला घेऊन तो पसार झाला. महिलेने आरडाओरडा केल्याने लॉजच्या मॅनेजरने येऊन तिची सुटका केली. तिने तातडीने सहकारनगर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य व मुलाच्या जिवाचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने पांढरेचा शोध सुरू केला. तेव्हा तो एका बसने प्रवास करीत असल्याचे आढळून आले. ही बस लातूरला जात असल्याचे आढळून आले. त्याबरोबर पोलिसांनी बसचा पाठलाग सुरू केला. त्याला लातूर येथील एका लॉजमधून बुधवारी पहाटे पकडून मुलाची सुखरूप सुटका केली.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे, कर्मचारी बापू खुटवड, महेश मंडलिक, भुजंग इंगळे, महादेव नाळे, सुशांत फरांदे, सागर सुटकर, सागर शिंदे, प्रदीप बेडीसकर यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिसlaturलातूरCrime Newsगुन्हेगारी