महापालिकेला लागली अभय योजनेतून लॉटरी
By Admin | Updated: January 31, 2016 04:31 IST2016-01-31T04:31:26+5:302016-01-31T04:31:26+5:30
थकबाकीदार मिळकतधारकांसाठी लागू केलेल्या अभय योजनेतून महापालिकेला लॉटरीच लागली आहे. आज एका दिवसात तब्बल १८ कोटी रुपयांची वसुली झाली असून योजना जाहीर

महापालिकेला लागली अभय योजनेतून लॉटरी
पुणे : थकबाकीदार मिळकतधारकांसाठी लागू केलेल्या अभय योजनेतून महापालिकेला लॉटरीच लागली आहे. आज एका दिवसात तब्बल १८ कोटी रुपयांची वसुली झाली असून योजना जाहीर केल्यापासून गेल्या २५ दिवसांत पालिकेला १०३ कोटी १५ लाख रुपये मिळाले आहेत. फेब्रुवारीमध्येही ही योजना लागू असून त्यात दंडामध्ये ५० टक्के सवलत आहे.
मिळकत कर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी ही माहिती दिली. पालिकेची सुमारे ५५० कोटी रुपयांची थकबाकी असून त्यावरील दंडाची रक्कम २५० कोटी रुपये आहेत. अनेक वर्षे ही थकबाकी वसूलच होत नसल्याने या वर्षी दंडात सवलत देण्याची योजना जाहीर करण्यात आली. २५ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी थकबाकी असलेल्यांनी जानेवारीत एकरकमी थकबाकी जमा केली, तर त्यांना दंडाच्या रकमेत ७५ टक्के, फेब्रुवारीत जमा केली तर ५० टक्के सवलत अशी ही योजना आहे.
योजना जाहीर केल्यापासून थकबाकीदारांनी पालिकेच्या सर्व करसंकलन विभागात गर्दी केली आहे. यापूर्वी एकाच दिवसात ४ कोटी रुपये वसूल झाले होते. तो विक्रम आज मोडला गेला. आज एकाच दिवसात १८ कोटी रुपये वसूल झाले.