मतदार याद्यांबाबत अळीमिळी..
By Admin | Updated: September 17, 2014 18:47 IST2014-09-17T00:30:20+5:302014-09-17T18:47:46+5:30
निवडणुका म्हटल्या, की वाद, प्रतिवाद, घोळ आदी गोष्टी ओघानेच आल्या असे समीकरण झालेले असले, तरी किमान साहित्यविश्व यातून वगळले जावे, अशी अपेक्षा व्यक्त होत असते.

मतदार याद्यांबाबत अळीमिळी..
पुणो : निवडणुका म्हटल्या, की वाद, प्रतिवाद, घोळ आदी गोष्टी ओघानेच आल्या असे समीकरण झालेले असले, तरी किमान साहित्यविश्व यातून वगळले जावे, अशी अपेक्षा व्यक्त होत असते. परंतु, सगळे जग तंत्रज्ञानाच्या बरोबर पाऊल टाकत असताना साहित्य महामंडळ मात्र उलटय़ा दिशेने प्रवास करीत आहे. मतदार याद्यांचा घोळ नेहमीचाच असला, तरी यंदा मतदारांचे ई-मेल व फोन नंबरच वगळण्यात आले आहेत. यामागे काही तरी मोठे रहस्य असल्याप्रमाणो गुप्तता बाळगून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाद्वारे आयोजित करण्यात येणा:या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली असून, उमेदवार नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदार याद्यांमध्ये दिवंगत व्यक्तीचीही नावे असणो, पत्ता पूर्ण नसणो, मतपत्रिका न पोहोचणो असे लोकसभा, विधानसभा निवडणुकांप्रमाणो सगळेच घोळ साहित्य विश्वातील या निवडणुकीतही यापूर्वी झालेले आहेत. परंतु,
तरीही साहित्यविश्वातील
निवडणूक ही राजकीय निवडणूक नाही, येथील मतदार सुज्ञ आहेत, असा गवगवा करून मतदारांना अंधारात तर ठेवले जात नाही ना, अशी शंका यंदाच्या मतदार याद्यांवरून साहित्यविश्वात व्यक्त केली जात आहे.
फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप हे निवडणुकीचे महत्त्वाचे साधन सध्या होत असताना, समाजाचे प्रतिबिंब उमटविणारे साहित्यक्षेत्र मात्र यापासून का पळ काढत आहे, असा सवालही विचारला जात आहे.
साहित्य महामंडळाकडून यावर मात्र उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, ‘‘महामंडळाच्या कार्यकारिणीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला असून महामंडळ विचारपूर्वकच निर्णय घेते.’’ या वेळी मी एवढेच सांगू शकते, असे म्हणत त्यांनी विषय गुलदस्तातच ठेवण्याचा प्रय} केला.
परंतु, उमेदवारांनी मतदारांर्पयत कसे पोहोचावे, यावर त्या म्हणाल्या, ‘‘साहित्यिक उमेदवाराचे साहित्य, बोलणो हेच त्यांचे सर्वात मोठे साधन आहे. याद्वारेच ते मतदारांर्पयत पोहोचतील. शिवाय, माध्यमे आहेतच त्यांची मते पोहोचविण्यासाठी. मतदारांना साहित्यिक घडामोडी अवगत असतातच. ते त्यांचे निर्णय घेऊ शकतील.’’ (प्रतिनिधी)
4औरंगाबाद साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी याबाबत अजब कारण दिले. अद्याप यादी मी बघितलेली नाही; त्यामुळे काही सांगू शकत नाही. परंतु, आमचा मतदार खेडय़ापाडय़ांतील आहे. त्यांच्याकडे ई-मेल नाही. खूप लोकांकडे फोनही नाही. त्यामुळे अध्र्याचा फोन नंबर द्यायचा आणि अध्र्याचा नाही, असे व्हायला नको म्हणून काढून टाकले आहेत, असे त्यांनी सांगितले.
यंदाच्या मतदार याद्यांवर माझी काहीच हरकत नाही. मतदारांशी संपर्क साधायचा प्रश्न असेल, तर शोधले की सापडते. तसेच पोहोचू मतदारांर्पयत.
- सदानंद मोरे,
ज्येष्ठ साहित्यिक व उमेदवार, संमेलनाध्यक्षपद
4मतदारांचे ई-मेल, फोन नंबर देण्याबाबत विनाकारण कमालीची गुप्तता.
4लोकसभा निवडणुकीप्रमाणो याही संमेलनाच्या याद्यांमध्ये घोळ.
4फेसबुक, टि¦टर, व्हॉट्सअॅपसारख्या आधुनिक माध्यमांपासून साहित्य परिषद दूरच.