उमेदवारांचे मतदारांसमोर घालीन लोटांगण वंदीन चरण.....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:26 IST2021-01-13T04:26:57+5:302021-01-13T04:26:57+5:30
कान्हूर मेसाई परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे रण पेटले असून मतदारावर रोज आश्वासनाचा पाऊस पडत आहे घरासमोरील घरासमोरील सिमेंट रस्ते ...

उमेदवारांचे मतदारांसमोर घालीन लोटांगण वंदीन चरण.....
कान्हूर मेसाई परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे रण पेटले असून मतदारावर रोज आश्वासनाचा पाऊस पडत आहे घरासमोरील घरासमोरील सिमेंट रस्ते घरी नळ कनेक्शन सुरक्षित बेरोजगार तरुणांसाठी महामंडळाचे कर्ज तसेच अपंग विधान करता घरपट्टी नळपट्टी करातून ५० % कर माफी देण्यात येईल अशा एकापेक्षा एक सरस लेखी घोषणा आपल्या जाहीरनाम्यातून देत आहेत.
एवढेच नसून घरोघरी जाऊन प्रत्येक जेष्ठ मतदारांचे दर्शन घेत मलाच मतदान करा असे साकडे घालीत आहेत भल्या सकाळीच उमेदवार घरी टपकत असल्याने घरातील नागरिकांची गोची होत आहे निवडणुकीला कमी दिवस राहिल्याने प्रचाराने वेग घेतला आहे. जास्तीत जास्त मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न उमेदवार जोमाने करीत आहेत दरम्यान अनेक जाहीरनाम्यामधील तेच तेच मुद्दे पाहून मतदारांकडून त्याला जुन्या बाटलीत नवी दारू अशी उपमा दिली जात आहे. तीन दिवसांपासून प्रचाराने चांगलाच वेग घेतला असून सर्वच पक्षाचे उमेदवार पॅनल प्रमुख आपले सर्व प्रयत्न पणाला लावत आहे प्रत्येक उमेदवाराची गट आपली नवी शक्कल लढवून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.......... नातीगोती भावकीला महत्त्व.......... ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील मातब्बर यांच्या प्रतिष्ठा पणाला लागत असल्यामुळे निवडून येण्या साठी नातीगोती भावकीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.निवडणुकीच्या निमित्ताने भावकीतील जुनी वाद मिटत असून काही ठिकाणी नवीन वाद उभे राहत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे मतदान मिळवण्यासाठी जुन्या संबंधांना उजाळा देऊन मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सध्या जोमात सुरू आहेत....