शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीमध्ये धावत्या 'पीएमपीएमएल' बसमधून धुराचे लोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 15:56 IST

हिंजवडी आयटीपार्कमधील फेज तीन हद्दीत धावत्या प्रवासी पीएमपीएमएल बसमधून अचानक धूराचे लोट निघू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

पुणे : हिंजवडी आयटीपार्कमधील फेज तीन हद्दीत धावत्या प्रवासी पीएमपीएमएल बसमधून अचानक धूराचे लोट निघू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.  बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना आज सकाळी कराच्या सुमारास हिंजवडी माण आयटीपार्क मधील फेज तीनच्या हद्दीत मेगापोलीस सोसायटी जवळ घडली. निगडी ते हिंजवडी माण फेज तीन मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये ही दुर्घटना घडली.                   शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास प्रवासी घेऊन निगडीकडे निघालेली पीएमपीएमएल बस अवघी एक स्टॉप पुढे गेली असता वाहनचालकाच्या केबीन मधून धुर येऊ लागला. चालकाने प्रसंगावधान दाखवत बस तत्काळ रस्त्याच्या बाजूला उभी करून प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले. अवघ्या काही मिनीटातच बसमधून मोठ्या प्रमाणात धुराचे प्रचंड लोट निघू लागल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली.

            इंजिनमधील बाहेरील बाजूस ऑईल अथवा डिजेल सांडल्याने  तसेच इंजिन जास्त प्रमाणात गरम झाल्याने मोठ्या प्रमाणात धुर निघाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आयटीपार्क हद्दीत प्रवासी पीएमपीएमएल बसला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने बस मधून प्रवास करताना आयटीयन्स तसेच स्थानिक ग्रामस्थांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीPMPMLपीएमपीएमएलfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल