शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या चार तासांत हरवलेला तीन वर्षाचा मुलगा पालकांच्या स्वाधीन; ऑपरेशन मुस्कानमुळे लागला तत्काळ शोध

By नितीश गोवंडे | Updated: December 3, 2024 08:54 IST

मुलाच्या आईने पोलिसांची व मुलाला पोलिसांकडे घेऊन गेलेल्या महिलेचे आभार मानले.

पुणे : वाघोली येथील बाईफ रोड येथील एका दुकानाजवळ सापडलेला तीन वर्षांचा मुलगा एका महिलेमुळे व पोलिसांच्या ऑपरेशन मुस्कानमुळे चार तासांत त्याच्या पालकांकडे पोहोचला. यावेळी मुलाच्या आईने पोलिसांची व मुलाला पोलिसांकडे घेऊन गेलेल्या महिलेचे आभार मानले.युनिट ६ चे अंमलदार प्रतीक्षा पानसरे, सचिन पवार हे हद्दीत गस्त घालत असताना वाघोली येथील बाईफ रोडवरील निखार लेडीज शॉपजवळ मनीषा चेतन सोनार हिने त्यांना एक लहान मुलगा सापडला असे सांगितले. त्यानंतर दोघेही अंमलदार त्याला युनिट ६ च्या कार्यालयात घेऊन गेले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहिद पठाण यांना याबाबत कळविले असता त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पथकाच्या वेगवेगळ्या टीम बनवून मुलाच्या घरच्यांचा शोध घेण्यास सांगितले. तसेच सर्व प्रसार माध्यमांवरही मुलाचा वर्णनासह फोटो प्रसिद्ध केला.यावेळी त्यांना डोमखेर रोड, बाईफ रोड, दत्तविहार या परिसरातील सोसायट्या, लेबर कॅम्प येथे पोलिस अंमलदारांनी शोध घेतला असता त्यांना अक्षय संस्कृती सोसायटीतील एक महिला मुलाचा शोध घेत असल्याचे समजले. त्या महिलेला मुलाचा फोटो दाखविला असता तिने तो मुलगा तिचाच असल्याचे सांगितले. मुलाचा शोध लागल्याने तिच्या डोळ्यांतील आश्रू थांबत नव्हते.

मुलाला भेटण्यासाठी ती कासावीस झाली होती. यावेळी पोलिसांनी तत्काळ मुलाला आईच्या हवाली केले. यावेळी मुलाची आई मनीषा चेतन सोनार यांनी सतर्क पुणे पोलिसांचे आभार मानले. अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ६ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे, पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, अंमलदार रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, सुहात तांबेकर, कानिफनाथ कारखेले आणि कीर्ती मांदळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी