शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

मावळातील १२ कोटींच्या भात पिकाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 14:27 IST

शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेला

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : पंचनाम्याचा अहवाल प्रशासनाकडून शासनाकडे सादरभरपाईच्या प्रतीक्षेत शेतकरी 

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या ५ हजार ४३६.७९ हेक्टरचे सर्व पंचनामे झाले असून, झालेल्या नुकसानीचे ११ कोटी ९१ लाख रुपये मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळावेत, यासाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी याबाबत माहिती दिली. अवकाळी पावसामुळे  मावळ तालुक्यातील १७८ गावांतील १२ हजार ७१४ शेतकऱ्यांचे भात पिकाचे नुकसान झाले होते. २० हजार ४०० रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई  मिळावी, असा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. नुकसान झालेल्या शेतीचे त्वरित पंचनामे करून याचा अहवाल शासनाकडे पाठवावा, अशी मागणी आमदार सुनील शेळके व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह विविध पक्षांतील शिष्टमंडळाने केली होती. यानंतर कृषी व महसूल खात्याने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शासनाने पाठवले. मावळ तालुक्यात भात हेच खरिपाचे मुख्य पीक असून यावर्षी १२ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर भातपीक घेण्यात आले. यंदाच्या हंगामात भात पिकाला आवश्यक गरजेच्या वेळी पाऊस झाल्याने पीक जोमात आले होते. यावर्षी भाताचे उत्पन्न चांगले येईल, या आशेवर शेतकरी आनंदात होता. परंतु आॅगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यात ९२० हेक्टर भात पिकाचे नुकसान झाले..........शेतकºयांच्या तोंडचा घास हिरावला १मावळ परिसरातील पिकांचे नुकसान झाले असून, त्यांचे पंचनामेदेखील करण्यात आले होते. जे पीक शेतात राहिले, त्यावर शेतकऱ्यांनी समाधान मानले. परंतु ऐन काढणीच्या हंगामात अवकाळी पाऊस सुरू राहिल्याने या पिकाचे पुन्हा नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेला. भरपाई कधी मिळणार याबाबत प्रतिक्षा आहे.........भरपाईच्या प्रतीक्षेत शेतकरी परतीच्या पावसाचा मावळ तालुक्यात मुक्काम लांबला होता. त्यानंतर अवकाळी पावसामुळेही शेतकरी हवालदिल झाले होते. भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील नुकसान झालेल्या भात पिकांचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. परंतु सदरची रक्कम कधी मिळणार या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmavalमावळRainपाऊसFarmerशेतकरी