व्यवसायात तोटा झाल्याने छातीत गोळी झाडून एकाची हडपसरमध्ये आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 19:01 IST2018-02-23T19:01:53+5:302018-02-23T19:01:53+5:30
हडपसर येथील एका व्यक्तीने छातीत गोळी झाडून आत्महत्या केली. फायनान्स कंपनीत तोटा झाल्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

व्यवसायात तोटा झाल्याने छातीत गोळी झाडून एकाची हडपसरमध्ये आत्महत्या
ठळक मुद्देफायनान्स कंपनीत तोटा झाल्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाजमाळवाडी येथील कार्यालय छातीत गोळी झाडून आत्महत्या
हडपसर : येथील एका व्यक्तीने छातीत गोळी झाडून आत्महत्या केली. फायनान्स कंपनीत तोटा झाल्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही घटना दुपारी सव्वा तीन वाजता येथील माळवाडी परिसरात घडली. अरविंद लक्ष्मण फाळके (वय ५४) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. आज दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान माळवाडी येथील कार्यालय छातीत गोळी झाडून आत्महत्या केली. येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करीत आहेत.