तडीपार गुंडाकडून तक्रारदाराची लूट

By Admin | Updated: January 9, 2017 03:18 IST2017-01-09T03:18:14+5:302017-01-09T03:18:14+5:30

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडल दोनच्या हद्दीमधून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाने तलवारीच्या

The looter of the complainant | तडीपार गुंडाकडून तक्रारदाराची लूट

तडीपार गुंडाकडून तक्रारदाराची लूट

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडल दोनच्या हद्दीमधून तडीपार करण्यात
आलेल्या गुंडाने तलवारीच्या धाकाने एका तक्रारदारालाच लुटल्याची घटना शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास डायस प्लॉटजवळ घडली. तडीपार गुंड घातक शस्त्रांसह मोकाट फिरत असल्यामुळे पोलिसांची कारवाई केवळ नावाला असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
आबा राधाकिशन सरोदे (वय ३५, डायस प्लॉट, गुलटेकडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मयूर कांबळे (वय २५, रा. गुलटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे. दहीहंडीच्या दिवशी झालेल्या दोन गटांतील भांडणाप्रकरणी सरोदेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत तक्रार मिळताच पकडायला गेलेल्या पोलिसांनाही त्याने धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. पुढील तपास सहायक निरीक्षक पी. आर. मोरे करीत आहेत. सरोदेविरुद्ध मारामारी, दंगल, शरीराविरुद्ध गंभीर दुखापत, घरफोडी यांसह सुमारे १२ गुन्हे दाखल आहेत.

Web Title: The looter of the complainant