वाकडेवाडीला पंचवीस लाखांची रोकड लुटली
By Admin | Updated: August 10, 2015 02:42 IST2015-08-10T02:42:40+5:302015-08-10T02:42:40+5:30
स्टील व्यापाऱ्यांकडून गोळा केलेली २५ लाखांची रोकड तरुणांवर हल्ला करून लुटण्यात आली. ही घटना वाकडेवाडी येथील भुयारी मार्गामध्ये शनिवारी रात्री आठच्या

वाकडेवाडीला पंचवीस लाखांची रोकड लुटली
पुणे : स्टील व्यापाऱ्यांकडून गोळा केलेली २५ लाखांची रोकड तरुणांवर हल्ला करून लुटण्यात आली. ही घटना वाकडेवाडी येथील भुयारी मार्गामध्ये शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी प्रदीप रमाशंकर दुबे (वय २७, रा. कुरुळी, आळंदी फाटा, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबे मूळचे उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यामधील बंदुकापूर गावचे रहिवासी आहेत. ते चाकण येथील एसबीएम स्टील कंपनीमध्ये आठ वर्षांपासून सुपरवायझर म्हणून काम करतात.
दुबे आणि झा फडके हौदाजवळ काकाजी यांना भेटले. त्यांच्याकडून १५ लाखांची रक्कम घेऊन ही सर्व रक्कम त्यांनी काळ्या रंगाच्या सॅकमध्ये ठेवली. त्यांनी पुन्हा शर्मा यांना फोन केला. व्यापाऱ्यांकडून मिळालेले २५ लाख रुपये घेऊन हे दोघेही मोटारसायकलवरून शनिवारवाडामार्गे शिवाजीनगर बस स्थानकासमोरून ते न. ता. वाडीमार्गे वाकडेवाडीच्या भुयारीमार्गामधून जात होते.
साधारणपणे आठच्या सुमारास अचानक त्यांच्यासमोर एक मोटारसायकल येऊन थांबली. अचानक ब्रेक दाबल्यामुळे तोल जाऊन दुबे आणि झा खाली पडले. दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार आरोपींनी दोघांनाही मारहाण करायला सुरुवात केली. तसेच दुबे यांच्या पाठीवरची सॅक हिसकवायला सुरुवात केली. दुबे यांनी सॅकचा पकडून ठेवलेला पट्टा त्यांच्या हातामध्ये राहिला. सॅक हाती लागताच आरोपी मोटारसायकलवरून खडकीच्या दिशेने पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त स्वप्ना गोरे, वरिष्ठ निरीक्षक कमलाकर ताकवले, दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ निरीक्षक जी. डी. पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
(प्रतिनिधी)