शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्वे नगरमध्ये भरदिवसा डोळ्यात मिर्चीची पूड टाकून वाईन शॉपची रोकड लुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 16:08 IST

वाईन शॉपची रोकड घेऊन जाणार्‍या दुचाकीस्वाराच्या डोळ्यात मिर्चीची पावडर टाकून पावणे सहा लाखाची रोकड लुटण्याचा प्रकार समोर आला आहे.राकेश लक्ष्मणसिंह परदेशी (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देही घटना घडली कर्वेनगर रस्त्यावरील ताथवडे उद्यानासमोर साडे तीन वाजण्याच्या सुमारासबॅगेत होती ५ लाख ६८ हजार रुपयांची रोख रक्कम

पुणे :  वाईन शॉपची रोकड घेऊन जाणार्‍या दुचाकीस्वाराच्या डोळ्यात मिर्चीची पावडर टाकून भरदिवसा पावणे सहा लाखाची रोकड लुटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने पुण्यातील सुरक्षाव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून आले आहे.  ही घटना कर्वेनगर रस्त्यावरील ताथवडे उद्यानासमोर सोमवारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका अज्ञात चोरट्याविरूद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश लक्ष्मणसिंह परदेशी (वय ३६, रा. प्रसाद बिबवेनगर, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश परदेशी हे एका वाईन शॉपमध्ये मॅनेजर आहे. शुक्रवार ते रविवार अशी तीन दिवसांची वाईन शॉपची जमा झालेली ५ लाख ६८ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन बँकेत भरण्यासाठी ते दुचाकीवरून निघाले होते. दरम्यान ते ताथवडे उद्यानाजवळ आले असता एका व्यक्तीने त्यांना गाडीचे चाक पंक्चर  झाल्याचे खोटे सांगितले. फिर्यादी यांनी त्यांची गाडी थांबवून गाडीवर बसूनच पाठीमागील टायर पंक्चर झाले आहे का याची पाहणी करीत असताना त्या व्यक्तीने फिर्यादी यांच्या डोळ्यात लाल मिर्चीची पावडर टाकली आणि त्यांच्या गळ्यात अडकवलेली काळ्या रंगाची  रोख रकमेची असलेली बॅग जबरदस्तीने चोरून नेली. फिर्यादी यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला मात्र चोरटा पसार झाला होता. अलंकार पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  परिमंडळ एकचे उपायुक्त बसवराज तेली यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक एस. जी. चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :ThiefचोरCrimeगुन्हाPuneपुणे