लसीकरणात ग्रामीण भागातील लोणी काळभोर आरोग्य केेंद्र अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:15 IST2021-09-06T04:15:04+5:302021-09-06T04:15:04+5:30

३१ ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये बजाज कोविड-१९ मेगा लसीकरण दिवस साजरा करण्यात आला. यासाठी बजाज कंपनीकडून १ ...

Loni Kalbhor Health Center tops rural areas in vaccination | लसीकरणात ग्रामीण भागातील लोणी काळभोर आरोग्य केेंद्र अव्वल

लसीकरणात ग्रामीण भागातील लोणी काळभोर आरोग्य केेंद्र अव्वल

३१ ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये बजाज कोविड-१९ मेगा लसीकरण दिवस साजरा करण्यात आला. यासाठी बजाज कंपनीकडून १ लाख ५० हजार कोविशिल्ड लसीचे डोसेस आणि त्यासाठी लागणाऱ्या १ लाख ७७ हजार एडी सिरिजेस उपलब्ध करून दिल्या. त्याच बरोबर लसीकरणानंतर फोटो काढण्यासाठी ५०९ सेल्फी स्टॅन्ड व लसीकरणाविषयी माहिती देणारे ५०० स्टॅन्ड बजाज कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच शासनाकडील उपलब्ध करून देण्यात आलेली कोविशिल्ड लस अशी एकूण २ लाख ५४ हजार २६३ लाभार्थ्यांना एकाच दिवसात संपूर्ण पुणे जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा लसीचा डोस देऊन लसीकरणाच्या इतिहासातील नावीन्यपूर्ण विक्रम करण्यात आला.

यासाठी पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांत ५५९ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आले होते, व त्यात २ हजार २३६ अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. या मोहिमेमध्ये ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली त्यांचा सत्कार पुणे जिल्हा परिषद कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी विभागीय आयुक्त सौरव राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार व इतर सर्व जिल्हा परिषदेचे मान्यवर पदाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात बजाज कंपनी सीएसआरमधून कोविड - १९ लसीकरण माध्यमातून योगदान देणारे उपाध्यक्ष पंकज बल्लाभ, आरोग्य प्रमुख डॉ. अमन प्रीत कौर व नियोजन प्रमुख डॉ. शुभांगी बोचरे तसेच जिल्हा परिषद पुणे अंतर्गत सर्वसाधारण बिगर आदिवासी भागातील लोणावळा नगरपालिका रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, लोणी काळभोर आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव व आरोग्यसेविका जे. पी. जाधव, महिला रुग्णालय, बारामती, आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत रांजणी उपकेंद्र यांचेसमवेत

आदिवासी दुर्गम क्षेत्रातील आंबेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळेघर, अंतर्गत तेरुंगण, जुन्नर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,आपटाळे,अंतर्गत पाडळी, खेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, डेहणे,अंतर्गत नायफड उपकेंद्र या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Loni Kalbhor Health Center tops rural areas in vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.