शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

'अधिक काळ सत्ता असली की माज येतो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 06:54 IST

संजय नहार यांना रामकृष्ण मोरे जीवनगौैरव पुरस्कार

पुणे : ‘भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांची देशाला गरज आहे. पक्षांमध्ये चांगले कार्यकर्ते असणे महत्त्वाचे असते. कोणत्याही एका पक्षाला जास्त वेळ सत्ता मिळाली की माज येतो. लोकशाही कायम टिकवून ठेवायची असेल तर दोन्ही पक्ष सशक्त होण्याची गरज आहे. कोणत्याही पक्षाला मंदिर, पुतळे बांधणाऱ्या नेत्यांची नव्हे, तर प्रामाणिक कार्यकर्त्यांची गरज आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर मार्मिक टिप्पणी केली. दाखल्यावरची जात जात नाही, तोवर जाती निर्मूलनाकडे जाता येणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानच्या वतीने माजी शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या नावाने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांना प्रदान करण्यात आला. सूर्यकांत पलांडे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. गजानन एकबोटे, रामदास फुटाणे, मोहन जोशी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.फुटाणे म्हणाले, ‘प्रत्येक पक्षात तीन प्रकारचे नेते असतात. रामकाटी बाभळ म्हणजे त्यांचा संबंध थेट हाय कमांडशी असतो. सुबाभळ वर्गातील नेते कालपर्यंत कुठेच नसतात. अचानक अनुभवी नेत्यांपेक्षा त्यांना जास्त महत्त्व प्राप्त होते. तिसरा वर्ग म्हणजे येडी बाभळ अर्थात सामान्य कार्यकर्ते असतात. कोणताही राजकीय पक्ष त्यांच्यावरच उभा असतो. आता पक्षांमधील येडी बाभळ कमी झाली असून भक्तांची संख्या वाढली आहे. भक्तांमुळे पक्ष संकटात येतो. अभिनंदन थोरात यांनी प्रास्ताविक केले. संजय बालगुडे यांनी सूत्रसंचालन केले.माणसांचे महामंडळ काढण्याची गरजसमाजात धर्मांधता वाढली आहे, याचा फायदा राजकीय पक्ष घेत आहेत. काँग्रेसने प्रत्येक जातीचे महामंडळ काढून जातीयतेला थारा दिला. भाजपाही सर्व जातीतील नेत्यांना मंत्रिपदे देऊन तोच कित्ता गिरवत आहेत. त्यापेक्षा माणसांचे महामंडळ काढण्याची गरज आहे, असे फुटाणे म्हणाले. नहार म्हणाले, ‘इतिहासात सगळ्या प्रशांची उत्तरे लपलेली आहेत. आपण उत्तरे शोधण्याऐवजी प्रश्न घेऊन पुढे जात आहोत. तो समाज सोयीस्करपणे उत्तरे विसरून प्रश्नांना चिकटून राहतो, त्या समाजाचे अस्तित्व धोक्यात येते.’

टॅग्स :ramdas phutaneरामदास फुटाणेBJPभाजपाcongressकाँग्रेस