शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे ते लोणावळा लोकल रद्द, प्रवाशांचे हाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 12:35 IST

पुणे ते लोणावळादरम्यान सकाळी 6.30 ते 8.50 वाजेपर्यंतच्या सर्व लोकल रद्द झाल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

पुणे - शिवाजीनगर आणि खडकी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान सोमवारी सकाळी 6 वाजता सुटणारी लोकल तांत्रिक कारणाने बंद पडली. या खोळंब्यामुळे पुणे ते लोणावळा दरम्यानची रेल्वे वाहतूक सकाळी तब्बल 50 मिनिटे विस्कळीत झाली असल्याची माहिती पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांनी दिली. 

सकाळी सिंहगड एक्सप्रेसच्या आधी 5.55 वाजता पुण्याहून लोणावळ्याला लोकल सुटते. खडकीजवळ त्याच्यात तांत्रिक बिघाड झाल्याने लोणावल्याकडे जाणारी वाहतूक बंद पडली. सुमारे 50 मिनिटांच्या प्रयत्नानंतर ही लोकल खडकी स्टेशनवर आणण्यात यश आले.त्यानंतर सिंहगड एक्स्प्रेसला सर्व स्टेशनवर थांबा देण्यात आला.

त्याचा परिणाम सिंहगड एक्स्प्रेसला उशीर झाला. सकाळची लोकल लोणावळ्याला जाऊन तोच रेक पुन्हा येत असल्याने लोणावल्याहून सुटणारी लोकल रद्द करावी लागली. प्रवाशांच्या सोयीसाठी इंद्रायणी एक्स्प्रेस सर्व स्टेशनवर थांबवण्यात आली. या सर्व प्रकाराने सकाळीच कामावर जाणारे कामगार, विद्यार्थी यांचे हाल झाले, बहुतेकांना कामावर पोहोचण्यास उशीर झाला.

अचानक उदभवलेल्या या परिस्थितीत सिंहगड व इंद्रायणी एक्स्प्रेस सर्व स्टेशनवर थांबून प्रवाशांची सोय करण्याचा प्रयत्न रेल्वेने केल्याचे मिलिंद देऊसकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेIndian Railwayभारतीय रेल्वेlonavalaलोणावळा