महाविद्यालयीन तरुणीवर लोणावळ्यात बलात्कार

By Admin | Updated: January 7, 2016 01:32 IST2016-01-07T01:32:42+5:302016-01-07T01:32:42+5:30

लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षांपासून महाविद्यालयीन तरुणीवर वेळोवेळी बलात्कार करणाऱ्या तरुणाच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lonavala rape on college girl | महाविद्यालयीन तरुणीवर लोणावळ्यात बलात्कार

महाविद्यालयीन तरुणीवर लोणावळ्यात बलात्कार

लोणावळा : लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षांपासून महाविद्यालयीन तरुणीवर वेळोवेळी बलात्कार करणाऱ्या तरुणाच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी यवतमाळ येथील असून, ती २०१०पासून पुण्यातील कॉलेजात शिकत आहे. मूळ यवतमाळ येथील व पुण्यातच शिकणाऱ्या तरुणासोबत तिची ओळख झाली. पुढे २०१२पासून या तरुणाने तिला वेळोवेळी लग्न करण्याचे आमिष दाखवीत तिला लोणावळा येथे फिरायला आणून बलात्कार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने यवतमाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यवतमाळ पोलिसांनी गुन्हा लोणावळा पोलिसांकडे वर्ग केला असून, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले तपास करीत आहेत.(वार्ताहर)

Web Title: Lonavala rape on college girl