लोणावळा : लोणावळा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र सोनवणे यांनी नगराध्यपदासाठी १० हजार ६८१ मतांच्या फरकाने मोठा विजय मिळवला. अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या लोणावळा नगरपालिकेवर राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. लोणावळा नगरपालिकेच्या स्थापनेपासून अद्यापपर्यंत लोणावळा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकही सदस्य गेलेला नाही. आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने नगरपालिकेवर आपला एकहाती झेंडा फडकवला आहे. लोणावळा नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाचा आज २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या १६ जागा, भाजप ४, शिवसेना १, काँग्रेस ३, अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल लोणावळा नगरपालिकेत निर्माण झाले आहे.
लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांचा पराभव
लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्ष व लोणावळा शहराची रणरागिणी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भाजपच्या सुरेखा जाधव यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या आरती तिकोने यांनी ४८४ मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला, सुरेखा जाधव यांना १,०२६ तर आरती तिकोने यांना १,५१० मते मिळाली.
प्रभाग क्रमांक पाचमधील अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपचे सुभाष डेनकर विजयी झाले आहेत. या प्रभागात राष्ट्रवादीचे मुकेश परमार आणि भाजपचे सुभाष डेनकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. मुकेश परमार यांनी सुभाष डेनकर यांच्यात मोठी लढत दिसून येत होती, डेनकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती, परंतु मतदारांनी स्थानिक उमेदवार असलेल्या सुभाष डेनकर यांना विजयाचा कौल दिला.
मागील वीस वर्ष नगरसेवक म्हणून राहिलेले राजू बच्चे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीच्या मंगेश मावकर यांनी बच्चे यांचा पराभव केला, तर माजी नगरसेविका रचना सिनकर, ब्रिंदा गणात्रा, सिंधू परदेशी, संजय गायकवाड त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांची मुलगी अश्विनी जाधव, भाजपचे लोणावळा शहर अध्यक्ष अनंता गायकवाड यांचा मुलगा शैलेश गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष भरत हरपुडे, माजी नगरसेविका कल्पना आखाडे, माजी नगरसेवक माणिक मराठे अशा दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
नगराध्यक्ष पदाचे प्रथम चार उमेदवार
राजेंद्र बबनराव सोनवणे - राष्ट्रवादी अजित पवार गट - १९,५२९ - विजयीगिरीश रमेश कांबळे - भाजप - ८८४८
सूर्यकांत विष्णू वाघमारे - शिवसेना - २७७९राजेंद्र जगन्नाथ दिवेकर - शिवसेना उबाठा - १९२२
विजयी उमेदवार
प्रभाग - विजयी उमेदवार - पक्ष - मते
प्रभाग १ अ - सना राजू चौधरी - शिवसेना उबाठा - १३०६प्रभाग १ ब - सनी राम दळवी - राष्ट्रवादी अजित पवार गट - १४३६प्रभाग २ अ - मंगेश दत्तात्रेय मावकर - राष्ट्रवादी अजित पवार गट - १४०१प्रभाग २ ब - अनिता अंभोरे - राष्ट्रवादी अजित पवार गट - बिनविरोधप्रभाग ३ अ - श्वेता पाळेकर गायकवाड - राष्ट्रवादी अजित पवार गट - बिनविरोधप्रभाग ३ ब - लक्ष्मी नारायण पाळेकर - राष्ट्रवादी अजित पवार गट - २०३६प्रभाग ४ अ - गायत्री धर्मेश रिले - राष्ट्रवादी अजित पवार गट - १२०२प्रभाग ४ ब - उषा अशोक चौधरी - काँग्रेस - १०७८प्रभाग ५ अ - वसुंधरा नितीन दुर्गे - राष्ट्रवादी अजित पवार गट - १२३६प्रभाग ५ ब - सुभाष सुमंत डेनकर - भाजप - १२७२प्रभाग ६ अ - रेश्मा अर्जुन पाठारे - भाजप - १४६२प्रभाग ६ ब - दत्तात्रय रामभाऊ येवले - भाजप १५५८प्रभाग ७ अ - आरती मारुती तिकोणे - राष्ट्रवादी अजित पवार गट - १५१०प्रभाग ७ ब - देविदास भाऊसाहेब कडू - भाजप - बिनविरोधप्रभाग ८ अ - सनी पांडुरंग घोणे - राष्ट्रवादी अजित पवार गट - १३७१प्रभाग ८ ब - दीपा मंगेश आगरवाल - राष्ट्रवादी अजित पवार गट - १६३३प्रभाग ९ अ - नयना मंगेश पैलकर - राष्ट्रवादी अजित पवार गट - ११२२प्रभाग ९ ब - मोबीन मोहम्मद इनामदार - अपक्ष - १३९५प्रभाग १० अ - वैशाली सुनील मोगरे - काँग्रेस - १५२८प्रभाग १० ब - अनिल महादू गवळी - काँग्रेस - १५८५प्रभाग ११ अ - भाग्यश्री महादेव जगताप - राष्ट्रवादी अजित पवार गट - १४६८प्रभाग ११ ब - जीवन प्रकाश गायकवाड - राष्ट्रवादी अजित पवार गट - १५३५प्रभाग १२ अ - स्वप्ना अतुल कदम - अपक्ष - ११९५प्रभाग १२ ब - सुमित प्रकाश गवळी - अपक्ष - १६१७प्रभाग १३ अ - धनंजय वसंत काळोखे - राष्ट्रवादी अजित पवार गट - २६७६प्रभाग १३ ब - प्रियंका किशोर कोंडे - राष्ट्रवादी अजित पवार गट - २८६२प्रभाग १३ क - सोनाली संभाजी मराठे - राष्ट्रवादी अजित पवार गट - २७०२
Web Summary : In Lonavala's 2025 elections, NCP's Rajendra Sonawane won by a significant margin, ending BJP's long-standing dominance. The NCP now controls the municipality with 16 seats. Former corporators faced defeat as NCP gains power, marking a major shift.
Web Summary : लोनावाला के 2025 चुनावों में, NCP के राजेंद्र सोनवणे ने भारी अंतर से जीत हासिल की, जिससे BJP का लंबे समय से चला आ रहा वर्चस्व समाप्त हो गया। NCP अब 16 सीटों के साथ नगरपालिका को नियंत्रित करती है। NCP की सत्ता में आने से पूर्व पार्षदों को हार का सामना करना पड़ा, जो एक बड़ा बदलाव है।