VIDEO- लोणी काळभोरनजीक अपघातात चालकाची अग्निशमन दलाकडून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 10:05 IST2018-03-13T09:56:13+5:302018-03-13T10:05:33+5:30
जवानांनी चालक शुद्धित असल्याचे पाहून कटर व स्प्रेडरच्या साह्याने काम करीत चालकाची सुखरुप सुटका केली.

VIDEO- लोणी काळभोरनजीक अपघातात चालकाची अग्निशमन दलाकडून सुटका
पुणे - आज पहाटे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर टोलनाक्यापुढे वाळूच्या उभ्या असलेल्या डंपरला सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने मागून धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या घटनेमधे ट्रकचा चालक सिकंदर अनसारी(वय ३०) हा जखमी अवस्थेत अडकल्याची माहिती पोलिसांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला कळविली.
पुणे अग्निशमन दलाकडून मुख्यालयातून रेस्क्यू व्हॅन व हडपसर अग्निशमन केंद्रातील फायरगाडी तातडीने रवाना करण्यात आली. घटनास्थळी पोहचताच जवानांनी चालक शुद्धित असल्याचे पाहून कटर व स्प्रेडरच्या साह्याने काम करीत चालकाची सुखरुप सुटका केली. चालकाच्या चेहऱ्यावर पायाला गंभीर दुखापत झाल्याचे समजते. जखमी चालकास रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
सदर कामगिरीमध्ये अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, अग्निशमन वाहन चालक संदिप कर्णे, बाठे तसेच जवान तानाजी गायकवाड, विलास दडस, नवले, मोटे, विनायक माळी, मनीष बोंबले, योगेश पिसाळ, सचिन आवाळे यांनी सहभाग घेतला.