शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘लोकमत’ स्वरचैतन्य दिवाळी पहाट; निलाद्री कुमार यांचे बहारदार सतारवादन ठरणार आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 15:17 IST

यंदा निलाद्री कुमार यांच्या सुरेल सतारवादन आणि महेश काळे यांच्या अद्वितीय स्वरांनी रसिकांचा पाडवा गोड होणार

पुणे : सतारीच्या मंजूळ तारा छेडत रसिकमनाचा ठाव घेणारे प्रसिद्ध सतारवादक निलाद्री कुमार यांच्या सतारवादनाचा सुरेल आविष्कार आणि अद्वितीय स्वरांच्या सादरीकरणातून असंख्य रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेले युवा गायक महेश काळे यांची ‘स्वरमैफल’ म्हणजे जणू रसिकांसाठी सुश्राव्य पर्वणीच. या जादुई कलाविष्कारांची ‘याची देही याची डोळा’ अनुभूती घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत मंगळवारी (दि. १४) पहाटे ५:३० वाजता आयोजित या कलाविष्कारांनी रसिकांची दिवाळी पहाट ‘स्वरचैतन्य’मयी होईल.

गेल्या नऊ वर्षांपासून लोकमत दिवाळी पहाट हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमाची रसिक आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा निलाद्री कुमार यांच्या सुरेल सतारवादन आणि महेश काळे यांच्या अद्वितीय स्वरांनी रसिकांचा पाडवा गोड होणार आहे. निलाद्री कुमार हे आघाडीचे सतारवादक असून, त्यांनी सतारवादनात वेगवेगळे प्रयोग करून रसिकांची मने जिंकली आहेत. जागतिक कीर्तीचे सतारवादक रवी शंकर यांचे शिष्य कार्तिक कुमार यांच्याकडून त्यांना सतारवादनाचा कौटुंबिक वारसा लाभला आहे, तर महेश काळे यांच्या स्वरांनी रसिकांना कायमच भुरळ घातली आहे. 

दोन प्रतिभावंत कलाकारांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक पंडित विजय घाटे साथसंगत करणार आहेत. ही स्वरमैफल म्हणजे रसिकांसाठी सुरेल पर्वणी ठरणार आहे. या कार्यक्रमाला लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी आणि पीएनजी ज्वेलर्स, गाेयल गंगा ग्रुप यांचे सहकार्य लाभले आहे. याशिवाय व्हिजन क्रिएटिव्ह ग्रुप, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व गिरीश खत्री ग्रुप यांचा सहयोग लाभला आहे. 

तरुणांपर्यंत पाेहाेचवले अभिजात संगीत नीलाद्री यांनी त्यांच्या सतारवादनाच्या कारकिर्दीची ४० वर्षे पूर्ण केली आहेत. सतारवादनात सातत्याने प्रयोगशील राहत त्यांनी 'झिटार' वाद्याची निर्मिती केली. त्यातून त्यांनी तरुणांपर्यंत अभिजात संगीताचा वारसा पोहोचवला. ‘संगीतात प्रयोगशील असायलाच हवे. जशी पिढी बदलते, तसेच त्यांची प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी बदलते. संगीताबाबतीतही तेच आहे. आजच्या पिढीची दृष्टी बदलली आहे. त्यामुळे त्यांना अनुसरून प्रयोग करत आहे,’ असे नीलाद्री कुमार सांगतात.

विनामूल्य प्रवेशिका मिळण्याची ठिकाणे   

- काका हलवाई स्वीट सेंटर : चित्रलेखा अपार्टमेंट, आयडियल कॉलनी, कोथरूड. प्रेस्टीज कॉर्नर, गणेशनगर रोड, नवसह्याद्री, अलंकार पोलिस स्टेशनशेजारी आयुर्वेद रसशाळेसमोर, कर्वे रोड, एरंडवणे.- खत्री बंधू पॉट आइस्क्रीम आणि मस्तानी : न्यू फ्रेंड्स कंपनी, पौड रोड, लोकमान्य कॉलनी, कोथरूड विठ्ठल मंदिरासमोर, मधुसंचय सोसायटी, कर्वेनगर गोयल गंगा हाऊसिंग सोसायटी, खाऊगल्ली, माणिकबाग. - लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड : श्रेयस अपार्टमेंट, नवीन डीपी रोड, गुरुगणेश नगर, कोथरूड • सेनापती बापट रोड, रत्ना हॉस्पिटलशेजारी, मॉडेल कॉलनी बांदल कॅपिटल, पौड रोड • केसरीवाडा, नारायण पेठ एस. एम. जोशी फाउंडेशन, पत्रकार भवन शेजारी, गांजवे चौक मीना सोसायटी, डहाणूकर कॉलनी, कोथरूड- रसिक साहित्य : आप्पा बळवंत चौक सिद्धी असोसिएट्स : ७५२, कुमठेकर रोड, सदाशिव पेठ • मनोहर सुगंधी : हरिवंश बिल्डिंग, अकरा मारुती कोपरा, शुक्रवार पेठ • मारणे हाईट्स, महात्मा फुले मंडई, टिळक पुतळ्याजवळ, मंडई • तानाजी चौक, शिवाजी पुतळ्याजवळ, कोथरूड गावठाण- पीएनजी ज्वेलर्स : ६९४ पीएनजी हाऊस, कुंटे चौक, लक्ष्मी रोड • कॉमर्स अवेन्यू, पौड रोड, आयडियल कॉलनी, कोथरूड. -  महालक्ष्मी लॉन्स : राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर.- लोकमत कार्यालय : सिंहगड रोड आणि लॉ कॉलेज रस्ता.

कधी - मंगळवार, १४ नोव्हेंबर, पहाटे ५:३० वा. 

कुठे - महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर.

मैफलीची पुणेकरांना प्रतीक्षा

दिग्गज कलाकारांच्या आविष्कारांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. या मैफलीची रसिकांना कायमच प्रतीक्षा असते. अशाप्रकारे भारतीय अभिजात संगीतातील प्रतिभावंत कलाकारांना आमंत्रित करून रसिकांना त्याची पर्वणी देणे याचा आनंद काहीसा वेगळाच असतो. पुण्यातील दर्दी रसिक मैफलीला उदंड प्रतिसाद देतील, हा विश्वास आहे. - पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप

सहभागी हाेण्याचा आनंद

हवेतील गारवा, दिव्यांचा लखलखाट अन् पक्ष्यांचा किलबिलाट अशा चैतन्यमयी वातावरणात दरवर्षी ही दिवाळी पहाट रंगते. लोकमतने आयोजित केलेल्या या उपक्रमाचा आम्हीदेखील एक भाग बनलो आहोत, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. - सुशील जाधव, विभागीय व्यवस्थापक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी

टॅग्स :PuneपुणेDiwaliदिवाळी 2023musicसंगीतMahesh Kaleमहेश काळेartकलाLokmatलोकमत