शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट : नदी पात्रातील राडारोडा रोखण्यासाठी ‘गस्ती पथक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 12:17 IST

नदी पात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकला जात असून पावसाळ्यात त्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देदंडात्मक कारवाई करणार : पालिकेच्या पाच झोनसाठी पाच स्वतंत्र पथके  पालिका आयुक्तांकडून शहरातील नद्यांची पाहणी सध्या सुरु

 पुणे : शहरातील मुळा-मुठा नद्यांसह अन्य नद्यांचे पात्र दिवसेंदिवस आकसत चालले असून राडारोडा आणि भराव टाकून जागा लाटण्याचेही प्रकार घडत आहेत. नदीपात्रामध्ये राडारोडा टाकण्यास प्रतिबंध बसावा याकरिता पालिका आयुक्त सौरभ राव यांनी परिपत्रक काढून गस्ती पथक नेमण्याचे आदेश दिले आहेत. क्षेत्रिय कार्यालय स्तरावरील पथकांसोबतच सुरक्षा विभागाची ५५ कर्मचाऱ्यांची पाच पथके नेमण्यात येणार आहेत. नदी पात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकला जात असून पावसाळ्यात त्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासोबतच नदीपात्राची शासकीय जागा लँड माफियांच्या घशात जाण्याची शक्यता आहे. याबाबत पालिकेकडे तक्रारी येत असतात. पालिका आयुक्तांकडून शहरातील नद्यांची पाहणी सध्या सुरु आहे. रिव्हर वॉकच्या माध्यमातून अधिकारी व पर्यावरण प्रेमी नागरिकांसोबत आयुक्त नदीपात्रांची सध्या पाहणी करीत आहेत. परंतू, उपनगरांमध्ये बºयाच ठिकाणी नदीपात्रामध्ये राडारोडा टाकून पात्रात भराव टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. बºयाचदा सर्वसामान्यांकडूनही राडारोडा नदीपात्रात टाकला जातो. हे प्रकार रात्रीच्या वेळी गुपचूप केले जातात. हे प्रकार बंद करण्यासाठी क्षेत्रिय कार्यालय स्तरावर पथके कार्यान्वित केली जाणार आहेत. तसेच महापालिकेच्या सुरक्षा विभागानेही गस्ती पथक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या क्षेत्रिय कार्यालय स्तरावर राडारोडा टाकणाºयांवर कारवाई केली जाते. आतापर्यंत अशा प्रकरची १३ वाहने जप्त करुन त्यांच्याकडून दंड वसुली करण्यात आलेली आहे. दंड वसुलीनंतर वाहन सोडून दिले जाते. सुरक्षा विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले, की ५५ कर्मचाºयांची पाच गस्ती पथके तयार केली जाणार आहेत. पालिकेच्या पाच झोनसाठी पाच पथके आणि त्यांना वाहन पुरवले जाणार आहे. या प्रत्येक पथकावर जमादारांचे नियंत्रण राहणार आहे. क्षेत्रिय कार्यालयांसोबत समन्वय साधून गस्त घालण्यात येणार आहे. यासोबतच क्षत्रिय कार्यालयांकडून प्रभावित भागांची यादी घेऊन त्यानुसार कारवाई केली जाणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाriverनदीSaurabh Raoसौरभ रावPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका