शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

लोकमत इम्पॅक्ट : हिरकणी कक्षासाठी मनसेचे 'टाळा ठोको' आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 16:31 IST

हिरकणी कक्षामध्ये बसून महिला कर्मचारी बिलांची आणि दैनंदिन प्रशासकीय कामे करत असल्याचे लोकमत ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आणले. 

ठळक मुद्देस्टिंग ऑपरेशनद्वारे वस्तुस्थिती उघडकीस आणताच प्रशासनाची धावपळ 

पुणे : महिला कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी महापालिकेमध्ये सुरु करण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचा वापर कार्यालयीन कामासाठी होत असल्याचे 'लोकमत'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आणल्यानंतर प्रशासनावर टीका होऊ लागली आहे. असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महापालिकेमध्ये आंदोलन केले. महिला कार्यकर्त्यांनी हिरकणी कक्षाला साखळी आणि कुलूप लावण्यात आले. या कक्षातील अन्य कामकाज बंद करण्याची मागणी केली. या कक्षामध्ये बसून महिला कर्मचारी बिलांची आणि दैनंदिन प्रशासकीय कामे करत असल्याचे लोकमत ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आणले. या बातमीची दखल घेत मनसेच्या शहर महिलाध्यक्षा रुपाली पाटील यांनी लावण्या शिंदे, वंदना साळवी, ज्योती कोंडे, नीता पालवे, अनुराधा घुगे, मनीषा कावेडीया, सुरेखा होले आदी महिला कार्यकर्त्यांसह पालिकेमध्ये आंदोलन केले. यावेळी रुपाली पाटील या स्वत:च्या मुलाला कांगारू बॅग मध्ये अडकवून आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. हातामध्ये निषेधाच्या पाट्या घेऊन प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हा कक्ष महिलांसाठीच वापरण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांना देण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी अनेक महिलांना मुलांना स्तनपान करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. महिलांची कुचंबणा आणि बाळाचे हाल होऊ नयेत यासाठी  ब्रेस्ट फिडींग प्रमोशन नेटवर्क कौन्सिलच्या सूचनेवरून शासनाच्या विविध विभागांमध्ये हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेमध्येही हा कक्ष सुरु करण्याची मागणी होत होती. 'लोकमत' ने याबाबत वारंवार पाठपुरावा केला होता. सरतेशेवटी महापालिकेमध्ये हा कक्ष सुरु करण्यात आला. हा कक्ष सर्वांसाठी खुला करण्यात यावा याकरिता काही राजकीय पक्षांनी आंदोलनही केले होते. हिरकणी कक्ष सुरू करण्यात आल्यानंतर येथे रंगरंगोटी करुन बेड, खेळणी, रंगीत मॅट बसविण्यात आले. हा कक्ष जेव्हा सुरु झाला तेव्हा दोन महिला  अटेंडन्ट ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, याठिकाणी कार्यालयीन कामकाज करण्यात येत होते. महिलांच्या कक्षामध्ये महिलाच फाईलींचे ढीग घेऊन काम करीत असल्याचे चित्र होते. स्तनदा मातांसाठी सुरू केलेल्या या कक्षाचा वापर जागृती अभावी होत नाही. ====महापालिकेच्या प्रशासनाने हिरकणी कक्षाच्या उद्देशाला हरताळ फासला आहे. 'लोकमत' ने याबाबत वस्तुस्थिती उजेडात आणून महिलांच्या महत्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून हा कक्ष केवळ महिलांच्या वापरासाठीच उपलब्ध करावा अशी मागणी केली आहे. - रुपाली पाटील, शहराध्यक्षा, मनसे महिला शाखा

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMNSमनसे