लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट ; महेश काळे व राकेश चौरसिया यांची होणार जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 08:44 PM2019-10-25T20:44:56+5:302019-10-25T20:46:43+5:30

लाेकमत आयाेजित दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये महेश काळे आणि राकेश चाैरसिया यांची जुगलबंदी हाेणार आहे.

lokmat diwali pahat program ; mahesh kale rakesh chourasiya will perform | लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट ; महेश काळे व राकेश चौरसिया यांची होणार जुगलबंदी

लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट ; महेश काळे व राकेश चौरसिया यांची होणार जुगलबंदी

Next

पुणे : अद्वितीय स्वरांच्या सादरीकरणातून असंख्य रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला युवा गायक महेश काळे आणि बासरीच्या मंजूळ स्वरांनी  रसिकमनावर मोहिनी घालणारे प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांची  ‘स्वरमैफल’ म्हणजे जणू रसिकांसाठी सुश्राव्य पर्वणी ठरते. या जादूई आविष्कारांची  ‘याचि देही याचि डोळा’ अनुभूती घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.  युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि डॉ. सागर गणपतराव बालवडकर यांच्या सहयोगाने सोमवारी (दि. २८) पहाटे साडेपाचला महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजित या  कलाविष्कारांनी रसिकांची दिवाळी पहाट   ‘स्वरचैतन्य’मयी होणार आहे. 

गेल्या पाच वर्षांपासून लोकमत  ‘दिवाळी पहाट’ हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमाची रसिक आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा महेश काळे यांच्या स्वरांनी रसिकांचा पाडवा  गोड होणार आहे. या कार्यक्रमात महेश काळे यांच्यासमवेत  राकेश चौरसिया यांच्या बासरीची जादूही अनुभवास मिळणार आहे. त्यांना तबल्यावर सत्यजित तळवलकर व पखवाजवर ओंकार दळवी साथसंगत करणार आहेत.  कार्यक्रमाला रांका ज्वेलर्स अणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे सहकार्य लाभले आहे.  याशिवाय काका हलवाई स्वीट सेंटर, खत्रीबंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, ऊर्जा, लक्ष्मीनारायण चिवडा हे सहयोगी प्रायोजक आहेत. धीरेंद्र अ‍ॅडव्हर्टायझिंग हे आऊटडोअर पार्टनर आहेत. 

मोफत प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध 
रांका ज्वेलर्स केंद्र 4लक्ष्मी रोड 4कर्वे रस्ता 4सिंहगड रस्ता 4रविवार पेठ.  लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, शाखा : डहाणूकर काॅलनी 4सेनापती बापट रस्ता.  4कर्वेनगर 4नवी पेठ 4सिंहगड रोड.  रसिक साहित्य : अप्पा बळवंत चौक 4बालगंधर्व रंगमंदिर 4यशवंतराव चव्हाण नाट्यगृह 4काका हलवाई स्वीट सेंटर : 4आयुर्वेदिक रसशाळेसमोर, कर्वे रोड 4शॉप नं. २, चित्रलेखा अपार्टमेंट, आयडियल कॉलनी, पौड रोड. 4शॉप नं. 1 अलंकार पोलीस चौकी, नवसह्याद्रीे. 4अभिनव कला महाविद्यालयाजवळ, टिळक रोड. खत्री बंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी : 4विठ्ठल मंदिर कॉर्नर, कर्वेनगर. 4गंगाधाम भाग्योदय अपार्टमेंट, सिंहगड रोड. 4शिवाजी पुतळा चौक, कोथरू ड. लोकमत कार्यालय : व्हीया व्हेंटेज बिल्डिंग, लॉ कॉलेज रोड.  वडगाव क ार्यालय : 4वडगाव खुर्द, सिंहगड रोड.

कार्यक्रम स्थळ   
महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ
दिनांक : सोमवार, २८ ऑक्टोबर  
वेळ : पहाटे ५.३० वाजता
कार्यक्रमाच्या विनामूल्य 
प्रवेशिका उपलब्ध. 

Web Title: lokmat diwali pahat program ; mahesh kale rakesh chourasiya will perform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.