शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत दिवाळी उत्सव’ महासोहळा उत्साहात, ‘मराठी बाणा’ने घडवले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 03:25 IST

उठी उठी गोपाळा, विठूचा गजर हरिनामाचा, झुंजुमुंजु पहाट झाली, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं, या गाण्यांचे मधुर स्वर, अस्सल मराठमोळ्या गाण्यांवर ताल धरणारे कलाकार यांच्यामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते.

पुणे : उठी उठी गोपाळा, विठूचा गजर हरिनामाचा, झुंजुमुंजु पहाट झाली, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं, या गाण्यांचे मधुर स्वर, अस्सल मराठमोळ्या गाण्यांवर ताल धरणारे कलाकार यांच्यामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते. प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या आणि शिट्ट्यांच्या स्वरूपातील प्रतिसादामुळे अशोक हांडे प्रस्तुत ‘मराठी बाणा’ला वेगळाच रंग चढला. मनोरंजन आणि रसिकांमधील ‘महासोहळ्या’ची उत्सुकता यांचा उत्कृष्ट मेळ साधत कार्यक्रमाची सुंदर गुंफण करण्यात आली.गणेश कला, क्रीडा रंगमंच येथे रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादात ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतीला अभिवादन करून, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. ‘लोकमत’ आयोजित ‘दिवाळी उत्सव महासोहळा’ आणि ७० एमएम ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले होते. या वेळी दिवाळी उत्सव महासोहळा लकी ड्रॉ, विशेष बक्षीस बंपर बक्षिसे घोषित करण्यात आली.या योजनेचे पॉवर्ड बाय पार्टनर एस.टी.ए. हॉलिडेज् आहेत. सहभागी झालेल्या व्यावसायिकांकडून खरेदी केलेल्या भाग्यवंत जोडप्यास बंपर बक्षीस म्हणून थायलंड येथे सहलीची संधी तसेच सहभागी व्यावसायिकांसाठी असणाºया लकी ड्रॉमध्ये एका भाग्यवंत व्यावसायिक जोडप्यास देशांतर्गत सहलीची संधी, पुण्यातील नामवंत पर्यटन कंपनी पी.एफ.टी. हॉलिडेज् तसेच विशेष पारितोषिक म्हणून मंदार मोटर्स (ळश्र) यांच्यातर्फे ज्युपिटर दुचाकी बक्षीस मिळाली. अशोक हांडे यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमात बहारदार गीतांची मेजवानी रसिकांनी अनुभवली. प्रथम तुज पाहता, काय बाई सांगू, पिंगा गं पोरी पिंगा,जिवा-शिवाची बैलजोड या गाण्यांनी ‘मराठी बाणा’ची रंगत वाढवली. गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, लग्नसोहळा, मंगळागौर, गोंधळ, गावच्या जत्रा अशा परंपरांच्या आठवणी ‘मराठी बाणा’च्या निमित्ताने ताज्या झाल्या. लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला, एकवीरा आई तू डोंगरावरी, गणा धावरे मला पाव रे, लखलख चंदेरी तेजाची सारी दुनिया अशा गीतांची सुंदर मालिका कार्यक्रमात गुंफण्यात आली होती. एकीकडे गोकुळाष्टमी, गणेशोत्सवाची धूम अनुभवत असताना लग्नसोहळ्यातील निरोपाच्या प्रसंगाने उपस्थितांचे डोळे पाणावले. तमाशाच्या फडाने लोकसंस्कृतीची झलक दाखवली. खंडेरायाच्या जागराने कार्यक्रमात जान आणली.देवीची एकाच वेळी अनेक रूपे पाहून सर्वच जण काही वेळ भारावून गेले होते. मराठी बाणा टिकवून ठेवण्यासाठी ‘शिवराया, पुन्हा एकदा जन्माला या’ अशी आर्त सादसर्वांनीच घातली. (प्रतिनिधी)चंद्रकांत देशमुख ठरले थायलंड सहलीचे विजेतेनिकालाचा क्रम : बक्षिसाचा प्रकार, सहभागी व्यावसायिकाचे नाव, विजेत्याचे नाव व कूपन क्रमांक :बंपर बक्षीस(थायलंड सहल) - गुरुकृपा सर्व्हिसेस : चंद्रकांत देशमुख (४८४६५)(देशांतर्गत सहल) - निर्मिती इंटेरियर्सविशेष बक्षीस - (टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी)स्वामिनी : मीरा शिर्के (६४०९)पहिले बक्षीस (एक लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचे गिफ्ट व्हाउचर) हॅशटॅग क्लोदिंग : अविनाश काकडे (५३७६४)दुसरे बक्षीस (५० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचे गिफ्ट व्हाउचर)सत्यम ज्वेलर्स : वनिता बारणे (४९१६०)श्री साई समर्थ प्रॉपर्टीज : अभय माळी (४५३३७)तिसरे बक्षीस (२५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचे गिफ्ट व्हाउचर)अजिंक्य बझार : उत्तम कुंभार (८५२१२), प्रणव मराठे ज्वेलर्स : जयश्री साठे (३८८८) सत्यम ज्वेलर्स : खुशबू केसी (४९७७६),स्वामिनी : सौ. हिरा बारगळ (२७८०६)चौथे बक्षीस (९,९९० रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचे गिफ्ट व्हाउचर) अजिंक्य बझार मॉल : अभय जाधव (९७१२२), अष्टेकर ब्रदर्स : रेखा जाधव (२००१६), हॅशटॅग क्लोदिंग : यश पानसे (५३३७०), पी.एन.गाडगीळ १८३२ : मंजिरी वेल्हाळ (७९०१), श्रीहरी खाडिलकर (२८८२६), प्रणव मराठे ज्वेलर्स : अनघा भडभडे (१७०४०), मुक्ता जोशी (१६२२१), दीपचंद ज्वेलर्स : सोमीनाथ नाकाडे (६११६३), श्री साई समर्थ प्रॉपर्टीज : अभय माळी (४५४०१),पूजा इलेक्ट्रॉनिक्स : सुमित महाडे (१४४७७)पाचवे बक्षीस (५,००० रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचे गिफ्ट व्हाउचर) बाफना ज्वेलर्स : स्मिता वंजारी (७७०२१), तिकाडे (७७१५६)दिलीप सोनिगरा ज्वेलर्स : बाळासाहेब कटके (१०८४५३)दीपाली खेंगले (१०८१८६), गणेश खांडगे (१०७७३८), मच्छिंद्र काजळे (१०७६२७), सिटी सेंट्रल मॉल : गणेश खैरे (७१००४), डोना फॅ शन वर्ल्ड : संजय जगताप (८१४०४), दुर्वांकूर वधू-वर सूचक केंद्र : दुर्वांकूर मुळे (१२७०३), गुरुकृपा सर्व्हिसेस : प्रसाद देशमुख (४८३२२), हिंमतलाल पी. ज्वेलर्स : शाम जोरी (५०१०), मोबाईल झोन : अतुल श्रीरामे (१२३५६), पी.एन.गाडगीळ १८३२ : प्राजक्ता शहाणे (७३८६), रानडे एस.एम. (८१६५). प्रणव मराठे ज्वेलर्स : अनघा भडभडे (१५७०३), अरुणा थोरात (१६४५०), संघवी डेव्हलपर्स : संतोष पवार (६७१३७), सत्यम ज्वेलर्स : लिना आर.सी. (४९५०२), स्वामिनी : बाबूराव दिधुळे (९४७६३), स्नेहल पाटील (९४८४९)

टॅग्स :marathiमराठीPuneपुणेnewsबातम्या