शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीची उधारी, उसणवारी अखेर मिटणार; निवडणूक अधिकाऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 13:22 IST

प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पावणे दहा कोटींचा निधी केला वितरित 

ठळक मुद्देखासगी पुरवठादारांच्या देयकामधुन जीएसटी व टीडीएस कपात करणे बंधनकारक

पुणे : राज्यात सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मंडप, निवडणूक साहित्य, कर्मचाऱ्यांचे जेवण, संगणकसह विविध प्रकारचा लाखो रुपयांच्या खर्चाची केलेली उधारी, उसणवारीवर अखेर मिटणार आहे. यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी (दि.12) रोजी हा उधारीवर केलेल्या खर्चाची रक्कम देण्यासाठी तब्बल 9 कोटी 71 लाख रुपयांचा निधी सर्व तहसिलदार यांच्याकडे वर्ग केला. राज्यात सन 2019 मध्ये लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन निवडणुका पार पडल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विविध सूचना व त्याची अंमलबजावणीमुळे निवडणूक खर्चात खूप मोठी वाढ झाली. परंतु निवडणूक काळात आयोग अथवा शासनाकडून प्रशासनाला पुरेसा निधी कधीच दिला जात नाही. यामुळेच संबंधित अधिकाऱ्यांना बहुतेक सर्व खर्च उधारी, उसनवारी करून पूर्ण करावा लागतो. परंतु निवडणूक होऊन वर्ष लोटले तरी निधी मिळत नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली होती. उधारीवर काम केलेले लोक आता पैसे मिळण्यासाठी मागे लागले आहेत. आता निधी मिळाल्याने उधारी देणे अधिकाऱ्यांना शक्य होणार आहे.हा निधी खर्च करताना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी उपलब्ध अनुदानातुन खासगी पुरवठादारांचे देयके प्रथम प्राधान्याने अदा करण्यात यावे, त्यानंतर अतिकालीक भत्ता अदा करतांना वर्ग 4, वर्ग 3, वर्ग 2 व वर्ग 1 अनुक्रमाने अदा करणेची दक्षता घ्यावी. ही खर्चाची रक्कम अदा करताना येणाऱ्या रोख स्वरुपात न देता आरटीजीएस व्दारे अदा करणेत यावे. कोणत्याही परिस्थितीत रोख रक्कमा अदा होणार नाहीत याची दक्षता घ्यावी व खाजगी पुरवठादारांच्या देयकामधुन जीएसटी व टीडीएस कपात करणे बंधनकारक केले आहे. 

मतदारसंघ क्रमांक व नाव मजुर निधी १९५ जुन्नर 18 लाख१९६ आंबेगाव 53 लाख 20 हजार१९७ खेड 50 लाख 30 हजार१९८ शिरुर 59 लाख 40 हजार१९९ दौंड 33 लाख 90 हजार२०० इंदापूर 34 लाख 60 हजार२०१ बारामती 39 लाख 40 हजार२०२ पुरंदर 28 लाख 60 हजार २०३ भोर 24 लाख२०३ वेल्हे 13 लाख२०३ मुळशी 42 लाख२०४ मावळ 52 लाख २०५ चिंचवड 46 लाख 70 हजार२०६ पिंपरी 63 लाख 90 हजार २०७ भोसरी 53 लाख 90 हजार208 वडगावशेरी 51 लाख 50 हजार209 शिवाजीनगर 40 लाख 20 हजार210 कोथरूड 33 लाख 30 हजार211 खडकवासला 83 लाख 50 हजार212 पर्वती 33 लाख 40 हजार 213 हडपसर 44 लाख 20 हजार 214 पुणे कॅन्टोंन्मेंट 35 लाख215 कसबा 35 लाख

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकlok sabhaलोकसभाcollectorजिल्हाधिकारीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका