शहरं
Join us  
Trending Stories
1
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
2
'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण?
3
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
4
अजित पवारांकडून जाहीरपणे समाचार, पण चंद्रकांत पाटलांनी संयम दाखवला; नेमकं काय घडलं?
5
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
6
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
7
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
8
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
9
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
गुरु आदित्य योग: ७ राशींना भाग्यकारक, येणी वसूल होतील; व्यवसायात नफा, नोकरीत पद-पगार वाढ!
11
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
12
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
13
९ वर्षांपासून फरार, FBI ने गुजराती तरुणावर ठेवले २०८००००० रुपयांचे बक्षीस, कोणता गुन्हा केलाय?
14
ऋतुजा बागवेची नवीन हिंदी मालिका 'माटी से बंधी डोर', प्रोमोला मिळतेय पसंती
15
"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित
16
अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा
17
TATA चा हा शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "अजून ४५% घसरणार..."
18
कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले
19
'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा
20
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला

अर्ज भरताना कुणाचे शक्तिप्रदर्शन तर कुणी दिला ‘हम साथ है’चा संदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 6:41 AM

बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व नेत्यांनी राजकीय फटकेबाजी केली.  

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: बारामतीकरांनी परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे. हा बदल होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आता भाकरी फिरवा. ही लढाई वैयक्तिक नसून, विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीची जाहीर सभा झाली. त्यावेळी शिंदे बोलत होते. ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते, त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या. कारण ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

सूनबाई दिल्लीला जातील : फडणवीस सुनेत्रा वहिनींना कोणी थांबवू शकत नाही. सूनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे. त्यामुळे विकासाला मत द्यायचं की विनाशाला मत द्यायचं, हा सर्वस्वी निर्णय बारामतीकरांचा असणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.

खोट्याला बळी पडू नका : पवार लोकसभेची निवडणूक गावकी आणि भावकीची नाही, तर देशाची आहे. त्यामुळे खोट्या प्रचाराला बळी पडू नका, असे अजित पवार म्हणाले.

राजेंनी बैलगाडीतून येऊन भरला अर्ज सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल केला. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता बैलांनी सजवलेल्या बैलगाडीत उदयनराजे स्वार झाले आणि रॅली जलमंदिर येथून गांधी मैदानाकडे निघाली. हलगी, नाशिक ढोलचा निनाद करत रॅली गांधी मैदानावर आली. पोवई नाक्यावर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा त्या ठिकाणी दाखल झाला. त्यांच्यासोबत पालकमंत्री शंभुराज देसाई, होते.  रॅलीत मकरंद पाटील उपस्थित राहणार का, याची उत्सुकता होती. मात्र, तेदेखील सहभागी झाले होते.

प्रणिती शिंदेंकडे ६.५ कोटींची संपत्ती  सोलापूर  लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी दुपारी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित हाेते. रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषा केलेले लाेक लक्ष वेधून घेत हाेते. श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाची वेशभूषा करूनही काही कलावंत सहभागी झाले हाेते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या नावे एकूण ६ कोटी ६० लाख ७० हजार रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याकडे ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने असून त्याची किंमत १९ लाख ६६, ५०० रुपये आहे. १ कोटी ६८ लाख ९८ हजार १८० रुपयांची जंगम मालमत्ता असून, ४ कोटी ९१ लाख ७२ हजार २२२ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. 

उन्माद दाखवत आहेत, त्यांना सत्तेबाहेर काढा : शरद पवार कोणी विरोध केला की त्याला तुरुंगात टाकले जात आहे. झारखंड, दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री, पश्चिम बंगालचे मंत्री यांनाही सोडले नाही. लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा हा प्रकार सुरू आहे. तो थांबवायचा असेल तर त्यांना सत्तेबाहेर काढायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी रास्तापेठेत जाहीर सभा झाली. त्यावेळी पवार म्हणाले, की आश्वासने द्यायची व ती विसरायची, असे चालले आहे. सत्तेचा उन्माद काय असतो ते केंद्र सरकार दाखवत आहे.

आजीने लढायला शिकवलंय! : सुळेपक्ष पळवला, चिन्ह पळवलं. नवे चिन्ह मिळाले तर म्हणू लागले, आता ही रडायला लागेल. पण, मी शारदाबाई पवार यांची नात आहे. त्यांनी मला रडायला नाही, तर लढायला शिकविले आहे, अशा तिखट शब्दांत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

पराभवाच्या भीतीनेच फोटोंची जंत्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘भाजपच्या जाहीरनाम्यात मोदी यांचेच ४८ फोटो आहेत. फोटो लावले नाहीत तर लोक आपल्याला विसरतील याची भीती त्यांना आहे. पराभवाची खात्री पटल्यामुळेच ते काहीही करत आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४PuneपुणेSunetra Pawarसुनेत्रा पवारUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेPraniti Shindeप्रणिती शिंदे