शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक 2024: आधी तिकीट नंतरच पक्षप्रवेश; वसंत मोरेंचा पॅटर्नच वेगळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 15:08 IST

Lok Sabha Election 2024, Vasant More Pune: मनसेतून उडालेलं वसंत मोरेंचं विमान अखेर वंचित बहुजन आघाडीत लँड

Lok Sabha Election 2024, Vasant More Pune किरण शिंदे, पुणेवसंत मोरे हे पूर्वाश्रमीचे मनसैनिक, मनसेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. मात्र आता बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे ते सैनिक झालेत. वसंत मोरेंनी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीत अधिकृतपणे प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करण्यापूर्वी वसंत मोरेंनी जवळपास सर्वच पक्षाचे उंबरे झिजवले आणि शेवटी मनसेतून उडालेलं त्यांचं विमान वंचित बहुजन आघाडीमध्ये लँड झालं. मात्र हे करतानाही वसंत मोरेंनी आधी लोकसभेचे तिकीट मिळवलं आणि त्यानंतर तीन दिवसांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

वसंत मोरेंना कोणत्याही परिस्थितीत लोकसभेच्या मैदानात उतरायचं होतं. मनसेतून आपल्याला तिकीट मिळणार नाही हे लक्षात येताच त्यांनी पक्षाला रामराम केला. इतके दिवस राज ठाकरे म्हणजे आपले दैवत आहेत असं सांगत फिरणाऱ्या वसंत मोरेंनी एका झटक्यात राज ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर सुरुवातीला त्यांनी महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेचे तिकीट मिळते का याची चाचपणी केली. शरद पवार, मोहन जोशी, संजय राऊत यांसारख्या महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट घेतली. मात्र तिथं काही त्यांचं जमलं नाही. मराठा आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या मनोज जरांगे पाटील यांचीही त्यांनी भेट घेतली. मात्र तिथेही गाडी पुढे गेली नाही. त्यानंतर मात्र वसंत मोरे यांनी थेट प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आणि पहिल्याच भेटीत त्यांचं तिकीट पक्कंही झालं. २ एप्रिलला त्यांच्या तिकिटाची घोषणाही झाली. मग त्यानंतर ३ दिवसांनी वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी प्रवेश केला.

दरम्यान, वसंत मोरे यांच्या उमेदवारीने पुण्याच्या निवडणुकीत रंगत येणार हे नक्की. सुरुवातीला पुण्याची निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अर्थात मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर यांच्यात होणार असं वाटलं होतं. वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीने ही निवडणूक अधिक रंगतदार होणार यात काही शंका नाही. वसंत मोरेंचा हा पॅटर्न पुणे लोकसभा निवडणुकीत चालेल का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Vasant Moreवसंत मोरेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीpune-pcपुणेMNSमनसे