लोकसभा निवडणूक 2019 : पुण्यात दुपारी बारा वाजेपर्यंत १३.८० तर बारामती मतदारसंघात १७.४६ टक्के मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 12:52 PM2019-04-23T12:52:53+5:302019-04-23T12:57:15+5:30

दोन्ही मतदारसंघातील महाआघाडी व महायुतीच्या पक्षांनी आपआपल्या उमेदवारासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. 

Lok Sabha elections: 13.80 percent in Pune and 17.46 percent voting in Baramati constituency between afternoon | लोकसभा निवडणूक 2019 : पुण्यात दुपारी बारा वाजेपर्यंत १३.८० तर बारामती मतदारसंघात १७.४६ टक्के मतदान 

लोकसभा निवडणूक 2019 : पुण्यात दुपारी बारा वाजेपर्यंत १३.८० तर बारामती मतदारसंघात १७.४६ टक्के मतदान 

googlenewsNext
ठळक मुद्देबापट , जोशी , कुल , सुळे यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार

पुणे: लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यांत राज्यातील १४ जागांसाठी आज मतदान होत आहे. या दोन्ही मतदार संघात मंगळवारी (दि.२३) दुपारी १२ वाजेपर्यंत पुण्यात १३.८० टक्के तर बारामतीत १७.४६ टक्के मतदान करण्यातआले आहे. पुण्यात कॉंग्रेसचे मोहन जोशी व भाजपाचे गिरीश बापट आणि बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे व भाजपाच्या कांचन कुल यांच्यात लढत होत आहे. या दोन्ही लढतींकडे संपूर्ण  राज्याचे ऱ्या लक्ष लागलेले आहे. या दोन्ही मतदारसंघातील महाआघाडी व महायुतीच्या पक्षांनी आपआपल्या उमेदवारासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. 
 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभमीवर पुणे व बारामती मतदार संघासाठी कला, राजकीय, चित्रपट, प्रशासकीय आदी क्षेत्रांसह सर्वसामान्य नागरिकांसह दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावला  आहे. या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार मे महिन्याच्या २३ तारखेला समोर येईलच. तूर्तास तरी बापट , जोशी , कुल , सुळे यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. 
.........................
पुणे  लोकसभा मतदार संघ टक्केवारी 
वडगाव शेरी - १५.६०%
शिवाजीनगर - १५.६०%
कोथरुड - १७.०५%
पर्वती - १७.८९%
पुणे कॅन्टोन्मेंट - १२.०६%
कसबा पेठ - १२.२३%
एकूण - १३.८०%
.................

बारामती लोकसभा मतदार संघ 
दौंड -१९.६४%
इंदापूर - २०.०१%
बारामती -२३.५०%
पुरंदर -१७.५०%
भोर -१२.४६%
खडकवासला - २०.०६%
एकूण - १७.४६%

Web Title: Lok Sabha elections: 13.80 percent in Pune and 17.46 percent voting in Baramati constituency between afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.