शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

२४ तासांपासून लोहगाव परिसर अंधारात : महावितरणच्या दिरंगाईमुळे नागरिकांना मनस्ताप 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 3:47 PM

वीजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडल्यामुळे लोहगाव परिसरातील काही भागातील वीज पुरवठा सोमवारी दुपारी 3 वाजता खंडीत झाला. महावितरणच्या कर्मचा-यांकडून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे

पुणे: वीजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडल्यामुळे लोहगाव परिसरातील काही भागातील वीज पुरवठा सोमवारी दुपारी 3 वाजता खंडीत झाला. महावितरणच्या कर्मचा-यांकडून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे.  मात्र,तब्बल 24 तास उलटून गेल्यानंतरही वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणच्या कर्मचा-यांना यश आले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मान्सूनच्या आगमानंतरच्या पहिल्याच पावसात शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला. 

          पावसाने उघडीप दिल्यानंतर महावितरणकडून काही भागातील वीज पुरवठा सुरूळीत करण्यात आला. मात्र,लोहगाव परिसरातील कर्मभूमी,पवार वस्ती, दादाची पडळ, वॉटर पार्क परिसरातील वीज पुरवठा सलग 24 तासापासून बंद आहे. वीज नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कर्मभूमी जवळ जमिनीखालील वीज वाहिनीत बिघाड झाला असून मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होईल, असे महावितरणच्या विश्रांतवाडी कार्यालयाच्या अधिका-यांनी सांगितले. परतु,दुपारी तीन वाजून गेल्यानंतरही या परिसरातील वीज पुरवठा सुरू झाला नाही.         जमीनीखालील नादुरूस्त झालेली वीज वाहिनी शोधण्यासाठी वेळ लागला. त्यामुळे या परिसरातील वीज पुरवठा बंद होता.कर्मभूमी परिसरात वीज वाहिनी दुरूस्तीचे काम सुरू आहे. लवकरच या परिसरातील वीज पुरवठा सुरू होईल,असे महावितरण कार्यालयाच्या नगर रस्त्यावरील वरिष्ठ अधिका-यांकडून सांगितले जात आहे.    

टॅग्स :electricityवीजLohgaonलोहगावRainपाऊस