वाहतुकीचा बोजवारा

By Admin | Updated: August 3, 2014 00:26 IST2014-08-03T00:26:18+5:302014-08-03T00:26:18+5:30

साचणारे पाणी, खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने बाबा भिडे पूल व नदीपात्रतील रस्ता बंद झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून पुणोकरांना वाहतूककोंडीत अडकावे लागत आहे.

Logging of traffic | वाहतुकीचा बोजवारा

वाहतुकीचा बोजवारा

पुणो : संततधार पावसामुळे रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे, त्यांत साचणारे पाणी, खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने बाबा भिडे पूल व नदीपात्रतील रस्ता बंद झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून पुणोकरांना वाहतूककोंडीत अडकावे लागत आहे. पावसामुळे सिग्नल बंद पडल्याने वाहतूककोंडी होत असल्याचे पोलीस कालर्पयत सांगत होते. मात्र, आज पावसाने पूर्ण उघडीप देऊनही अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. 
खडकवासला धरणातून गेल्या दोन दिवसांत मोठय़ा प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने नदीपात्रतील रस्ता तसेच बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला होता़ त्यात पुराचे पाणी पाहण्यासाठी पुणोकरांनी गर्दी केल्याने एस़ एम़ जोशी पूल, म्हात्रे पूल, ङोड ब्रिज या परिसरात वाहनांची मोठी गर्दी झाली होती़ त्याचा सर्व ताण जंगली महाराज रस्ता, फग्यरुसन रस्ता, शास्त्री रस्ता, कव्रे रस्ता या रस्त्यांवर आला होता़ पावसामुळे वाहनांचा वेग मंदावल्याने तसेच काही सिग्नल बंद पडल्याने शहरातील अनेक चौकांमध्ये वाहतूककोंडी झाली होती. 
खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाल्यानंतर नदीपात्रतील रस्ता तसेच भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली़ त्यासाठी सकाळपासूनच वाहतूक शाखेचे पोलीस त्या ठिकाणी ठेवण्यात आले होत़े शहरातील अनेक रस्त्यांवर विशेषत: ज्या ठिकाणी सिमेंटच्या रस्त्यांच्या मध्ये काही भाग ब्लॉक तसेच डांबरी आहेत, तेथेच खड्डे पडून पाणी साचत असल्याचे दिसून आल़े त्यामुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या़ पावसामुळे काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता़ त्याचा परिणाम होऊन सिग्नल बंद पडल़े त्यामुळे सर्व वाहतुकीचे संचालन वाहतूक पोलिसांना हाताने करावे लागत होत़े शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले असून, त्याचा परिणामही वाहतुकीवर होत आह़े 
 
ओव्हरटेकिंगमुळे वाहतूककोंडीत भर
4वाहतूककोंडी झाल्यावर समोरून येणा:या वाहनांना जागा न ठेवता पुढे जाण्याचा प्रयत्न करणा:या वाहनांमुळे या कोंडीत आणखीच भर पडताना दिसत होती़ त्यात शहरातील काही रस्त्यांवर मोटारींचे डबल पार्किग होत असल्याने वाहनांना जाण्यासाठी अगदी चिंचोळी जागा उरत होती़ फग्यरुसन रोडवरील रूपाली हॉटेल ते वैशाली हॉटेलदरम्यान हा प्रकार दिवसभर सातत्याने पाहायला मिळत होता़ 

 

Web Title: Logging of traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.